मुंबई : मार्च महिन्यात होळी साजरी केली जाते. यंदाच्या वर्षी 17 मार्चे रोजी होळी आहे. होलिका दहनाच्या दिवशी होलिकाची पूजा केली जाते. या दिवशी काही विशेष उपाय केल्याने फायदा होतो. होलिकाची पूजा एखाद्या शुभ मुहूर्तावर केली पाहिजे. पूजा करताना काही नियमांचे पालन केले पाहिजे. कोणतीही पूजा मुहूर्तावर झाली पाहिजे... असा भारतीय संस्कृतीचं माननं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या होळीची पूजा आणि दहन करण्याचा शुभ मुहूर्त 17 मार्च 2022 रोजी रात्री 09:06 ते 10:16 मिनिटांपर्यंत असेल. म्हणजेच होलिका दहनासाठी फक्त 1 तास 10 मिनिटे यंदाच्या वर्षी आहे.


'या' व्यक्तींनी पाहू नका होलिका...
होलिका दहनाची पूजा करणे, होलिका दहनात सहभागी होणे खूप चांगले मानले जाते, परंतु धार्मिक शास्त्रांमध्ये ठराविक लोकांना होलिका दहन पाहण्यास सक्त मनाई आहे.


नवविवाहित मुलींना होलिका दहन पाहू नये कारण, होलिका दहनाचे म्हणजे जळत्या शरीराचे प्रतीक मानले जाते. याचा अर्थ आपण शेवटच्या वर्षातील आपल्या शरीराला अग्नी देत आहोत. म्हणून नवविवाहित महिलांनी होलिकेच्या अग्निचे दर्शन घेणे अयोग्य मानले जाते. 


(वरील माहिती सर्वसामान्य समजुतींवर आधारित आहे, झी 24 तास याची खातरजमा करत नाही)