मुंबई : ज्योतिष आणि धार्मिक मान्यतेनुसार पोर्णिमेनंतर येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. जेव्हा गणेश चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा ती अंगारकी चतुर्थी असते. यावेळी वैशाख कृष्ण तृतीया ३ एप्रिलला अंगारकी संकष्टी आलीये. या दिवशी विघ्नहर्ता गणेशाची पूजा-अर्चा केली जाते. या दिवशी व्रत केल्यास पूर्ण वर्षभर चतुर्थी व्रताचे फळ मिळते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळदेवाने कठीण तपस्या केल्यानंतर प्रसन्न होत गणपतीने त्यांना वरदान दिले की जेव्हा मंगळवारी चतुर्थी येईल तेव्हा त्याला अंगारकी चतुर्थी म्हटले जातेय. या दिवशी व्रत केल्यास मनुष्याच्या सर्व कामांमध्ये येणाऱी बाधा, विघ्ने दूर होतात.


अंगारकी चतुर्थी पूजा-विधी


या दिवशी उपवास केला जातो. दूध, फळांचे सेवन केले जाते. तसेच धूप-दीप, पुष्प, दूर्वा अर्पित केल्या जातात. गणपतीला मोदक अधिक प्रिय आहेत. त्यामुळे  संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर मोदकाचा नैवैद्य गणपतीला दाखवला जातोय.


आज चंद्रोदय - ९.३२ वाजता