Weekly Tarot Card horoscope 14 August to 20 August 2022 :  सोमवारी 15 ऑगस्ट त्यानतंर जन्माष्टमी असलेला पुढील आठवड्या तुमच्यासाठी कसा असेल. कुठल्या राशीसाठी पुढच्या आठवडा चांगला असेल किंवा कुठल्या राशीला अडचणीचा सामना करावा लागेल हे आज आपण जाणून घेणार आहोत. टॅरो कार्डद्वारे तुमचा आठवडा कसा असेल ते बघूयात 


मेष (मार्च 21-एप्रिल 20)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा आठवडा या राशींच्या व्यक्तींसाठी जरा काळजीचा असेल. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील गोष्टींबद्दल विचार करुन तुम्ही या आठवड्यात अस्वस्थ राहू शकता. नियम, परंपरा आणि चालीरीती हे बंधन वाटू शकतं. इतरांच्या बोलण्यात येऊ नका. व्यवसायसंबंधीत योजनांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. दुसऱ्यांना दोष देणे आणि स्वत:बद्दल सहानुभूती बाळगण्याऐवजी अनुभवांमधून शिका आणि पुढे जा. मिथुन राशीच्या लोकांकडून प्रेम आणि सहकार्य मिळेल. 


भाग्यवान क्रमांक: 9 शुभ रंग: ओल्ड रोज


वृषभ (21 एप्रिल-21 मे)



ऑफिसमधील राहिलेली कामं पूर्ण कराल. घर आणि ऑफिसमधील सजावटीमुळे आजूबाजूला पॉझिटिव्ह एनर्जी वाटेल. या आठवड्यात आरोग्य, खाणंपिणं आणि पैशासंबंधी गोष्टींना प्राधान्य राहिल. सामाजिक व्यस्तता असूनही तुम्हाला उत्साह जाणवेल. मुलं आणि जोडीदाराकडून आनंद मिळेल. खेळ आणि व्यायामात रस घ्याल. 


भाग्यवान क्रमांक: 6 शुभ रंग: मस्टर्ड यलो


मिथुन (22 मे-21 जून)


या आठवड्यात वैयक्तिक संबंधात गोडवा राहिल तर व्यावसायिक जीवनात यश मिळले. या आठवड्यात नशीब तुमच्यासोबत असेल. कौटुंबिक कार्यक्रमात उपस्थिती लावाल. कला आणि सर्जनशील कार्यात सहभागी घ्याल. योग आणि ध्यानामुळे तुम्हाला पॉझिटिव्ह वाटेल. आईकडून कौटुंबिक बाबतीत धडे मिळतील.


भाग्यवान क्रमांक: 3 शुभ रंग: रेनबो पेस्टल्स


कर्क (22 जून - 22 जुलै)


जीवनाच्या प्रवाहात अगदी सहजतेने आणि जाणीवपूर्वक वाटचाल कराल. त्यामुळे तुम्ही योग्य दिशेने जात आहात हा विश्वास दृढ होईल. वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंधात सहकार्य मिळेल. व्यावसायात कल्पना आणि योजना आखाल. मैत्रीतील आपुलकीच्या भावना प्रेमात बदलू शकता. आरोग्य आणि पैशांशी संबंधित गोष्टींकडे लक्ष द्या.


भाग्यवान क्रमांक: 1 शुभ रंग: लोटस पिंक


सिंह (23 जुलै-23 ऑगस्ट)


या आठवड्यात व्यावसायिक आणि आर्थिक व्यवहारात बिझी राहणार असून नवीन संधी मिळतील. तुम्हाला भौतिक लाभ आणि सन्मान मिळेल. तसंच या आठवड्यात महत्त्वाचे काम सुरू होऊ शकते. स्वार्थी आणि संकुचित दृष्टीकोन असलेल्या व्यक्तींपासून दूर टाळा. तिसऱ्या व्यक्तीला वैयक्तिक संबंधांमध्ये हस्तक्षेप करण्याची संधी देऊ नका. (numerology horoscope weekly tarot card horoscope 14 august to 20 august 2022 in marathi)


भाग्यवान क्रमांक : 3 रंग: चेरी रेड


कन्या (ऑगस्ट 24-सप्टेंबर 23)


या आठवड्यात अध्यात्माच्या मार्गावर वाटचाल केल्यास प्रत्येक तणावातून मुक्तता अनुभवायला मिळेल. तसंच अनपेक्षित घटना घडतील. या आठवड्यात तुमच्याकडे पाहुणे येऊ शकतात. इतरांच्या म्हणण्यामध्ये येणे टाळा. तुमच्या आणि इतरांच्या स्वातंत्र्याचा आदर करा.


भाग्यवान क्रमांक: 14 शुभ रंग: मोर हिरवा


तूळ (सप्टेंबर 24-ऑक्टोबर 23)


वैयक्तिक नातेसंबंधातील संघर्ष आणि कामाच्या ठिकाणी स्पर्धेला सामोरे जावं लागू शकतं. विविध कामांमध्ये व्यस्त राहाल. या आठवड्यात तुम्ही कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवाल. 


भाग्यवान क्रमांक: 5 शुभ रंग: मोहरी पिवळा


वृश्चिक (24 ऑक्टोबर-22 नोव्हेंबर)


हा आठवड्यात जीवनात आनंद मिळेल आणि नातेसंबंधात उत्साह राहिल.  जोडीदाराला इतर मित्रांशी संवाद साधताना पाहून द्वेष वाटू शकतो. नात्यांमधील स्वातंत्र्याला महत्त्व द्या. नवीन संधी आकर्षित होतील. 


भाग्यवान क्रमांक: 8 शुभ रंग: फ्लेम ऑरेंज


धनू (23 नोव्हेंबर-23 डिसेंबर)


जीवनात महत्त्वाचे बदल होण्याचे योग आहेत, त्यामुळे प्राधान्यक्रम ठरवावा लागणार आहे. जुन्या सवयी आणि नातेसंबंधात बदल होण्याची शक्यता आहे. मीन राशीच्या व्यक्तीकडून तुम्हाला प्रेम आणि सहकार्य मिळेल. आरोग्य आणि आर्थिक बाबींवर लक्ष द्या.


भाग्यवान क्रमांक: 18  रंग: सिल्व्हर ग्रे


मकर (24 डिसेंबर - 20 जानेवारी)


 अवाजवी अपेक्षांचे वजन ठेवल्यास जीवन संघर्षमय वाटेल. तुम्ही अथक परिश्रम करत आहात, पण समस्या अशी आहे की तुमच्या मनाने इतरांनी ठरवलेली उद्दिष्टे आणि कालमर्यादा स्वीकारली आहे. वैयक्तिक नातेसंबंधांच्या विश्लेषणात गुरफटून जाण्यापेक्षा त्यांच्यावर प्रेमाने जिंका.


भाग्यवान क्रमांक: 6 शुभ रंग: पांढरा


कुंभ (21 जानेवारी-19 फेब्रुवारी)


नवीन शक्यता निमार्ण होणार आहे, त्यामुळे सावधान राहून तुम्हाला प्रथम संधींचा अंदाज घ्यावा लागेल. या आठवड्यात तुम्ही आनंदी राहाल आणि इतरांना सहकार्य कराल. आपले शब्द आणि कार्य समर्पणाने पूर्ण करा. वैयक्तिक संबंधांमध्ये प्रेमाने तुम्ही आनंदी व्हाल.


भाग्यवान क्रमांक: 2 शुभ रंग: फारेस्ट ग्रीन


मीन (20 फेब्रुवारी - 20 मार्च)


नशीब तुमच्या सोबत असल्यामुळे तुम्हाला नवीन संधी दिसून येतील. प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. जीवनात विरोधाभास देखील महत्वाची भूमिका बजावतात. प्रगतीच्या मार्गावर जाण्यासाठी जीवनचक्र समजून घेणे आणि स्वीकारणे आवश्यक आहे. अनपेक्षित घटना तुम्हाला चकित करू शकतात.


भाग्यवान क्रमांक: 10 रंग: रॉयल ब्लू