Grah Gochar October 2024 Horoscope : वैदिक ज्योतिषशास्त्र हे ग्रह आणि नक्षत्राच्या हालचालीवर अवलंबून आहे. प्रत्येक महिन्यात एका ठराविक वेळेनंतर आपली स्थिती बदलतात. ग्रहांची स्थिती बदल हा मानवी जीवनावर परिणाम करतात. ऑक्टोबर महिन्यात अनेक मोठे आणि महत्त्वाचे ग्रह आपली स्थिती बदलणार आहेत. त्यामुळे ग्रहांची ही स्थितीबदल काही राशींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ ठरणार आहे. ऑक्टोबर महिन्यात कोणते ग्रह गोचर करणार आहेत आणि कोणाला या ग्रहांमुळे नुकसान सहन करावा लागणार आहे, याबद्दल आपण जाणून घेऊयात. (October 2024 Horoscope Grah Gochar Transit of 4 major planets including Sun Mercury in October these zodiac signs people have to face problems )


बुध संक्रमण 2024


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंचांगानुसार, 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:13 वाजता, ग्रहांचा राजकुमार म्हणजेच बुध आपली स्थिती बदलणार आहे. बुध ग्रह तूळ राशीत प्रवेश करणार असल्याने तूळ राशीच्या लोकांना लाभ मिळू शकतो. यावेळी प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात आणि व्यावसायिकांना नफाही मिळणार आहे. 


शुक्र संक्रमण 2024


संपत्तीचा कारक शुक्र 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 6:13 वाजता वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र ग्रहाला संपत्ती, वैभव, ऐश्वर्य, सौंदर्य, सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानलं जातं. मेष आणि वृश्चिक राशीच्या लोकांना फायदा होईल. आर्थिक स्थिती सुधारणा होणार असून सुखसोयीत वाढ होणार आहे. 


सूर्य संक्रमण 2024


शुक्र संक्रमणानंतर 3 दिवसांनी, ग्रहांचा राजा म्हणजेच सूर्य देखील आपली राशी बदलणार आहे. 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 7:47 वाजता सूर्य तूळ राशीत प्रवेश करेल. यामुळे तूळ राशीच्या लोकांना काही समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. तुम्हाला आरोग्याशी संबंधित काही समस्यांना करावा लागणार आहे. 


मंगळ संक्रमण 2024


20 ऑक्टोबर रोजी ग्रहांचा सेनापती म्हणजेच मंगळ राशी बदलेल. दुपारी 2:50 वाजता मंगळ कर्क राशीत प्रवेश करेल. यामुळे कर्क राशीच्या लोकांना काही मानसिक ताण सहन करावा लागणार आहे. तसंच आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे त्रास होऊ शकतो. यावेळी, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी, आपण काळजीपूर्वक विचार केल्यास बरं होईल. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)