Padmini Ekadashi 2023 Lucky zodiac sign : प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतं असते. अधिक मासातील ही एकादशी दर तीन वर्षांनी येतं असते. तर यंदाची पद्मिनी किंवा कमला एकादशी अतिशय खास आणि शुभ आहे. यंदा 19 वर्षांनंतर ब्रम्ह योगावर (brahma yoga) ही एकादशी आली आहे. त्याशिवाय आज इंद्र योगही (indra yoga) जुळून आला आहे. त्यासोबतच सिंह राशीत लक्ष्मी नारायण योग (Lakshmi Narayan Yoga) जुळून आला आहे. त्यामुळे काही राशींवर भगवान विष्णुची विशेष कृपा बरसणार आहे. (padmini ekadashi 2023  Lucky zodiac sign horoscope indra yoga brahma yoga Lakshmi Narayan Yoga)


तूळ (Libra)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तूळ राशीचे अच्छे दिन सुरु होणार आहे. तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे. कुटुंबात आनंदी वातावरण असणार आहे. महत्त्वाचं काम मार्गी लागल्यामुळे चिंता मिटणार आहे. आर्थिक स्थिती सुधारणार आहे. 


मकर (Capricorn)


या राशींच्या डोक्यावरून कर्जाचे ओझे सुटणार आहे. त्यासोबतच आर्थिक स्थिती चांगली झाल्यामुळे कुटुंबातील सदस्य खूष असणार आहेत. आर्थिक व्यवहार किंवा गुंतवणूक करताना काळजी घ्या. जवळच्या व्यक्तीच्या भेटीमुळे मनं प्रसन्न होणार आहे. 


वृषभ (Taurus)


या राशीच्या लोकांना कमला एकादशीला भगवान विष्णुची कृपा बरसणार आहे. या लोकांना अचानक प्रगती आणि यश प्राप्त होणार आहे. रखडलेली कामं सहज मार्गी लागणार आहेत. तुमच्या वाणीवर अनेक कामं सहज होणार आहेत. या काळात तुम्हाला अनेक सुवर्ण संधी लाभणार आहेत. 


धनु (Sagittarius) 


या लोकांना अनेक मार्गांनी यश प्राप्त होणार आहे. अचानक धनलाभाचे योग चालून येणार आहे. गुप्त शत्रूवर विजय मिळवण्यात तुम्हाला यश मिळणार आहे. तुमच्या वागण्या बोलण्यातून आजूबाजूच्या लोकांची मनं जिंकणार आहात. 


कन्या (Virgo)


या राशीच्या लोकांचे नशीब चमकणार आहे. भगवान विष्णुंचा कृपेने या लोकांना अचानक आर्थिक फायदा होणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून धनलाभाचे योग आहेत. प्रत्येक काम वेळेत पूर्ण होणार आहे. महत्त्वाची कामं, खरेदीसाठी हा उत्तम काळ असणार आहे. 


हेसुद्धा वाचा - Padmini Ekadashi 2023 : आज 19 वर्षांनंतर ब्रम्ह योगावर पद्मिनी एकादशी! जाणून घ्या पूजाविधी, मुहूर्त आणि पारणाची वेळ



(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)