मुंबई : प्रत्येक व्यक्तीच्या तळहातावर खूप साऱ्या रेषा असतात. त्यांना हस्तरेषा म्हणून ओळखले जाते. या रेषा आपल्याला अगदी सामान्य वाटत असल्या तरी, त्यांना हस्तरेषा शास्त्रानुसार खुप महत्व आहे. कारण या रेषा तुमचं भविष्य सांगतात. हस्तरेषा शास्त्रानुसार प्रत्येक माणसाच्या तळहातावर जीवनरेखा, हृदयरेखा आणि शिररेखा असतात. याशिवाय तुम्हाला तुमच्या आयुष्यात किती पैसा मिळेल, हे दाखविणारी एक विशेष रेषा असते. या रेषांना जोडून काही विशेष खुणा किंवा चिन्ह तयार होतात. ते तुम्हाला तुमची आर्थिक स्थिती दर्शवतात. अशा स्थितीत हातावरील कोणती रेषा किंवा चिन्ह आपल्या संपत्तीबद्दल सांगतात हे जाणून घेऊया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- हस्तरेषा शास्त्रानुसार हस्तरेखांचा शुक्र पर्वत भौतिक सुख दाखवतो. तर हस्तरेखांवरील सूर्य पर्वत आदर आणि कीर्तीबद्दल सांगतो. तसेच हातावर गुरूचं असणं नेतृत्व क्षमता दर्शवते. जर एखाद्या व्यक्तीच्या तळहातावर या तीन पर्वतांची स्थिती चांगली असेल, तर त्याला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.


- हस्तरेषा शास्त्रानुसार, हस्तरेषा, जीवनरेषा आणि भाग्यरेषा मिळून इंग्रजीचा 'M' चिन्ह बनले, तर ती व्यक्ती 35 ते 55 वर्षांच्या कालावधीत भरपूर पैसा कमावतात.


- तसेच असे लोक लग्नानंतर खूप पैसे कमावतात. याशिवाय असे लोक नोकरी-व्यवसायातही खूप प्रगती करतात.


- हस्तरेषा शास्त्रानुसार काही लोकांच्या तळहातातील भाग्यरेषा संपत्तीची स्थिती दर्शवते. मनगटापासून सरळ रेषा बाहेर येऊन शनीच्या पर्वतापर्यंत पोहोचली, तर अशा लोकांना अचानक धनलाभ होतो. अशा लोकांना मेहनतीपेक्षा जास्त मिळते.


- जीवनरेषा, भाग्यरेषा आणि हृदयरेषा किंवा भाग्यरेषा, हृदयरेषा आणि शिररेषा यांच्या तळहातावर त्रिकोण तयार झाला असेल, तर व्यक्तीला अनेक स्रोतांमधून पैसे मिळतात.


- ज्या लोकांच्या तळहातावरील भाग्यरेषेतून एक रेषा निघते आणि ती सूर्य पर्वतावर जाते, असे लोक आर्थिक बाबतीत भाग्यवान असतात. यासोबतच अशा लोकांना सामाजिक प्रतिष्ठाही मिळते.


(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.)