Astrology Tips : हातालरच्या रेखा माणसाचं नशिब सांगतात. ज्योतिष व हस्तरेखा शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या  हातावर असे काही निशाण जे त्यांच्या नशिब घडवत असतात. व्यक्तीने कितीही मेहनत घेतली तर त्यांच्या मेहनीतला दिशा या हातांवरील रेशांवरुन ठरवता येवू शकते(Astrology Tips). हस्तरेषाशास्त्रात(Palmistry) काही रेषा आणि चिन्हे खूप भाग्यवान असल्याचे म्हटले जाते. हातावर काही विशिष्ट प्रकारचे निशाण असणारे लोक खूपच भाग्यशाली असतात. तर काही लोकांच्या आयुष्यात या रेषांमुळे राजयोग जुळून येतो. 


हे चिन्ह असणाऱ्यांच्या आयुष्यात असतो राजयोग


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तळहाताच्या मध्यभागी बाण, तोरण, शंख किंवा ध्वज अशी चिन्ह असणाऱ्यांच्या आयुष्यात राजयोग असतो.  या व्यक्ती जीवनात असाध्य गोष्टीही साध्य करु शकतात. आयुष्यात त्याला जे काही मिळवायचे असते ते त्याला मिळते. त्या व्यक्ती राजासारखे आयुष्य जगतात. त्यांना जीवनात कोणत्याच गोष्टीची कमी जाणवत नाही. यांच्या आयुष्यात कायम भरभराट होते. 


आयुष्यात पैसास पैसा


एखाद्या व्यक्तीच्या हाताच्या अंगठ्यावर तलावाचे किंवा माशाचे प्रतीक असलेले चिन्ह असेल तर त्याला भरपूर धन प्राप्त होते. अशी व्यक्ती समाजात मानाचे स्थान निर्माण करते. त्याचे जीवन राजेशाही आहे. व्यवसायात तो मोठे नाव कमावतो. यांच्या आयुष्यात पैसास पैसा असतो. 


उच्च पद मिळते


हस्तरेषा शास्त्रानुसार, जर हस्तरेखा मनगटापासून हाताच्या बोटाच्या खाली शनि पर्वतापर्यंत जात असेल आणि ती अगदी स्पष्ट असेल, तर अशा लोकांना उच्च पदांवर नियुक्ती मिळते. आयुष्यात भरपूर पैसा आणि मान, सन्मान मिळतो. त्यांच्यावर शनिदेव देखील प्रन्न असतो. त्यांच्यावर शनिदेवाची सदैव  कृपा राहते.


राजकारणात यश मिळते


जर एखाद्या व्यक्तीच्या तळहातावर हृदय रेषेच्या सुरुवातीला त्रिशूल चिन्ह असेल तर असे लोक राजकारणात खूप नाव कमावतात. राजकारणात त्यांना हवे ते मोठे पद मिळते. या लोकांना आयुष्यात कशाचीही कमतरता भासत नाही. 


हत्तीचे चिन्ह असलेल्या व्यक्तींवर सरस्वती व लक्ष्मीचा वरदहस्त 


हस्तरेखा शास्त्रानुसार हातावर हत्तीचे चिन्ह असलेल्या व्यक्तींवर सरस्वती व लक्ष्मी या दोघांचा वरदहस्त असतो. हत्ती हे गणपतीचे प्रतिक मानले जाते. त्यामुळे अशा व्यक्ती बुध्दीवान, कलाकार असतात.


माश्याचे निशाण असणाऱ्यांच्या नशिबात परदेश वारीचे योग


माश्याचे निशाण असणाऱ्यांच्या नशिबात परदेश वारीचा योग असतो. बहुतांश वेळा परदेशी गुंतवणुकीतून यांना अधिक फायदा होऊ शकतो. भौतिक सुख व आलिशान आयुष्य त्यांचे ध्येय असते.