तळहातावर कुठे असते धन रेखा? पाहा तुमच्या आयुष्यात धन वर्षांव होणार का?
आपला हात पाहातो आणि आपल्या हातांच्या रेषा पाहून, ज्योतिष आपलं भविष्य भाकीत करतो.
मुंबई : बऱ्याचदा आपण ज्योतिषाकडे आपलं भविष्य जाणून घेण्यासाठी जातो. तेव्हा तो आपला हात पाहातो आणि आपल्या हातांच्या रेषा पाहून, तो आपलं भविष्य भाकीत करतो. ज्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यात होणाऱ्या बदलांबाबत कळतं. आपल्या तळहातावरील रेषा या काळानुसार बदलत असतात. परंतु त्यावरुनच जोतिष आपलं आरोग्य, कुटुंब, मुले, करिअर याशिवाय सांगतात.
तुम्हाला ही तुमच्या तळहातावरील रेषांबाबत काही जाणून घ्यायचं असेल, तर आज आम्ही हातावर पैशांची रेख कुठे असते आणि तेथे कोणतं चिन्ह असतं, याबद्दल सांगणार आहोत.
तळहातावर पैशाची रेषा कुठे असते?
हस्तरेषा शास्त्रानुसार करंगळीच्या खाली असलेल्या सरळ उभ्या रेषेला मनी लाईन म्हणतात. ज्या लोकांच्या तळहातावर ही रेषा खोल आणि स्पष्ट असते, त्यांना आयुष्यात खूप पैसा मिळतो. तसेच असे लोक पैशाचा वापर खूप विचारपूर्वक करतात.
तळहातावर गजलक्ष्मी योग
हस्तरेषा शास्त्रानुसार, जर दोन्ही तळहातांची भाग्यरेषा बांगड्यापासून सुरू होऊन थेट शनी पर्वतापर्यंत जाते. तसेच सूर्य रेषा स्पष्ट आणि सरळ असेल तर गजलक्ष्मी योग तयार होतो. गजलक्ष्मी योग संपत्तीचा कारक मानला जातो. अशा लोकांना अचानक आर्थिक लाभ होतो.
तराजूचं चिन्ह
तळहातावर तराजूचे चिन्ह असणे शुभ मानले जाते. हे चिन्ह भविष्यात पैशाची कमतरता भासणार नाही याची खूण आहे. ज्यांच्या तळहातावर हे चिन्ह असते, त्यांना लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळतो.
स्वस्तिक चिन्ह
हस्तरेषा शास्त्रानुसार हस्तरेखातील स्वस्तिक हे शुभाचे प्रतीक आहे. ज्या लोकांच्या तळहातावर हे चिन्ह असते, ते धनाच्या बाबतीत इतरांपेक्षा पुढे असतात. अशा लोकांना पैशाची कमतरता नसते.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमान करत नाही.)