मुंबई : हस्तरेषाशास्त्रावर बरेच लोक विश्वास ठेवतात. खरंतर हे शास्त्र आपल्या तळहातावर असलेल्या रेषांचा आणि त्यांच्या विशिष्ट आकाराचा आपल्या आयुष्याशी असणारा अर्थ सांगतात. तसेच हे आपल्याला भविषातील काही गोष्टींचे संकेत देतात. आपल्या हातावरील काही चिन्ह हे खूप शुभ असतात, तर काही अशुभ देखील असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका चिन्हाबद्दल सांगणार आहोत. खरंतर हे चिन्ह म्हणजे इंग्रजीमधील एक शब्द आहे.  हे चिन्ह M च्या आकाराचं आहे. तळहातातील काही विशेष रेषा M चा आकार तयार करतात तेव्हा ते खूप शुभ असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या लोकांची जीवनरेषा, मेंदूची रेषा आणि भाग्यरेषा त्यांच्या तळहातावर एमचा आकार बनवतात, ते खूप भाग्यवान असतात. या लोकांना कधीही पैशाची कमतरता नसते. हे लोक गरीब कुटुंबात जन्माला आले असले तरी काही वर्षांतच ते अमाप संपत्तीचे मालक बनतात.


अशा लोकांना आयुष्यात खूप यश मिळते. त्यांनी कोणत्याही क्षेत्रात करिअर केले तरी त्यांना उच्च स्थान मिळते. हे लोक आयुष्यभर संपत्ती, वैभव आणि ऐश्वर्य उपभोगतात आणि मान-सन्मानही मिळवतात.


या हस्तरेखाच्या खुणाही खूप शुभ असतात


जर जीवनरेषा, मेंदू रेखा आणि भाग्यरेषा मिळून तळहातावर त्रिकोण बनत असेल, तर ते देखील खूप शुभ चिन्ह आहे. अशा लोकांना जीवनात भरपूर पैसा आणि यश देखील मिळते पण त्यासाठी त्यांना खूप वाट पहावी लागते. आयुष्याच्या शेवटच्या दशकात तो विलासी जीवन जगतो. या वर्षांत त्यांना संसाराची सर्व सुख प्राप्त होतात.


दुसरीकडे, जर मेंदूची रेषा आणि हृदयाची रेषा यांच्यामध्ये X किंवा क्रॉस असेल, तर अशा लोकांना खूप पैसा मिळतो. हे लोक त्यांच्या बुद्धिमत्तेच्या आणि ज्ञानाच्या जोरावर श्रीमंत आणि लोकप्रिय बनतात. सहसा असे लोक राजकारणात चांगले नाव कमावतात किंवा काही मोठे काम करून खूप प्रसिद्धी मिळवतात.