Palmistry: भाग्याशाली लोकांच्या तळाहातावर असते M खूण; अचानक उजळू शकतं नशीब!
आज आम्ही तुम्हाला अशाच एका चिन्हाबद्दल सांगणार आहोत. खरंतर हे चिन्ह म्हणजे इंग्रजीमधील एक शब्द आहे. हे चिन्ह M च्या आकाराचं आहे. तळहातातील काही विशेष रेषा M चा आकार तयार करतात तेव्हा ते खूप शुभ असते.
Palmistry: हस्तरेषाशास्त्रावर बरेच लोक विश्वास ठेवतात. खरंतर हे शास्त्र आपल्या तळहातावर असलेल्या रेषांचा आणि त्यांच्या विशिष्ट आकाराचा आपल्या आयुष्याशी असणारा अर्थ सांगतात. तसेच हे आपल्याला भविषातील काही गोष्टींचे संकेत देतात. आपल्या हातावरील काही चिन्ह हे खूप शुभ असतात, तर काही अशुभ देखील असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका चिन्हाबद्दल सांगणार आहोत. खरंतर हे चिन्ह म्हणजे इंग्रजीमधील एक शब्द आहे. हे चिन्ह M च्या आकाराचं आहे. तळहातातील काही विशेष रेषा M चा आकार तयार करतात तेव्हा ते खूप शुभ असते.
हातावर M असा आकार असल्याचा अर्थ
ज्या व्यक्तीच्या हातावर M असा आकार असतो, ती व्यक्ती पुढे जाऊन अनेक मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडते. शिवाय ती स्वतःच्या आयुष्यात खूप पुढेही जाते.
ज्या लोकांची जीवनरेषा, मेंदूची रेषा आणि भाग्यरेषा त्यांची मिळून तळहातावर M आकार बनत असेल तर त्या व्यक्ती खूप भाग्यवान असतात. या लोकांना कधीही पैशाची कमतरता जाणवत नाही. गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या व्यक्तीही कालांतराने अमाप संपत्तीचे मालक बनतात.
तळहातावर M असलेल्या अशा लोकांना आयुष्यात खूप यश मिळते. त्यांनी कोणत्याही क्षेत्रात करिअर केले तरी त्यांना उच्च स्थान मिळते. हे लोक आयुष्यभर संपत्ती, वैभव आणि ऐश्वर्य उपभोगतात आणि मान-सन्मानही मिळवतात.
हातामध्ये M असं चिन्ह असेल आणि इतर ग्रहही चांगले असतील तर ती व्यक्ती राजकारणात उच्च पदावर पोहोचू शकते.
ज्या लोकांच्या हातात M ची खूण अशा व्यक्ती खूप विचार असतात. इतकंच नाही तर या लोकांनी कल्पनाशक्ती चांगली असते. अशा व्यक्ती सहसा लेखक, विचारवंत, कलाकार बनतात.
तळहातावर M असं चिन्ह असलेल्या व्यक्तींना कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. या व्यक्ती वयाच्या 50 वर्षानंतरी प्रचंड संपत्तीचे मालक बनतात.
तळहातावर M अशी खूण असेल तर त्या व्यक्ती जीवनसाथीच्या बाबतीतही भाग्यवान असतात. अशा व्यक्तीचा साथीदार त्याच्यावर खूप प्रेम करतो.
(वरील माहिती सर्वसामान्य धारणांमधून घेण्यात आली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)