Panchak October 2022: हिंदू धर्मात प्रत्येक शुभ कार्य मुहूर्तानुसार केले जाते. मुहूर्त काढताना ग्रह-नक्षत्रांची स्थिती पाहिली जाते. पण पंचक काळात शुभ कार्य करण्यास मनाई आहे. ज्योतिषशास्त्रानुसार पंचकमध्ये शुभ कार्य करत नाही. 6 ऑक्टोबरपासून पंचक सुरू झालं असून 10 ऑक्टोबर 2022 रोजी संध्याकाळी 4 वाजून 3 मिनिटांनी संपेल. पंचक दरम्यान एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या मृतदेहासोबत पिठाचे 5 गोळे, पुतळे किंवा कुशाचा पुतळा ठेवावा, त्यामुळे पंचक दोष समाप्त होतो. अन्यथा पंचकमध्ये एखाद्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबातील 5 लोकांच्या आयुष्यात संकट येऊ शकते, असे मानले जाते. पंचकांमध्ये लंकापती रावणाचाही मृत्यू झाला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंचक काळात या गोष्टी करू नयेत


-पंचक काळात दक्षिण दिशेला प्रवास करू नये. त्यामुळे प्रवासात नुकसान होते.


-पंचक काळात घरावर छत टाकू नये. अन्यथा घरात कलह निर्माण होतो आणि धनहानीही होते.


-पंचक काळात अंथरूण किंवा पलंग खरेदी किंवा बनवू नये.


-पंचक काळात लाकूड, काठ्या किंवा कोणत्याही प्रकारचे इंधन खरेदी करू नये.


Kojagiri Pournima 2022: कोजागिरी पौर्णिमेला 4 राशींवर असेल देवी लक्ष्मीची कृपा, तुमची रास आहे का? वाचा


पंचक काळात तुम्ही या गोष्टी करू शकता


पंचक काळात पूजा करता येते. धनिष्ठा, शतभिषा, पूर्वा भाद्रपद आणि रेवती नक्षत्र असे काही विशेष योग पंचक काळात तयार झाले तर प्रवास, मुंडणकाम आणि व्यवसायाची महत्त्वाची कामे होऊ शकतात. याशिवाय उत्तराभाद्रपद नक्षत्रानुसार सर्वार्थ सिद्धी योग जुळून आल्यास साखरपुडा, विवाह, नवीन कार्याची सुरुवात यांकरता येतात.


(Disclaimer: इथे दिलेली माहिती सामन्य मान्यता आणि माहितीच्या आधारे दिली आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)