Parshuram Jayanti 2023 : धार्मिक ग्रंथानुसार जगाचा रक्षक भगवान विष्णू हे वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला पृथ्वीतलावर अवतरले होते.  ज्यावेळी विष्णून पृथ्वीवर अवतरले तेव्हा ते भगवान परशुराम रुपात आले होते. भगवान परशुराम हे भगवान विष्णूचे सहावे अवतार मानले जातात.  त्यामुळे या दिवशी भगवान परशुराम यांची जयंती साजरी केली जाते. देशात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी अनेक ठिकाणी शोभा यात्रा काढली जाते.  असं म्हणतात या दिवशी भगवान परशुरामाची पूजा केल्यास अपार फळं मिळतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धार्मिक ग्रंथांमध्ये भगवान परशुराम यांचा उल्लेख हा राम जमदग्नय, राम भार्गव आणि वीरराम असा करण्यात आला आहे.  हिंदू धर्मात असं म्हणतात की, भगवान परशुराम आजही पृथ्वीवर राहतात.  त्यामुळे इतर देवतांसाठी राम आणि कृष्णाप्रमाणे भगवान परशुराम यांची पूजा हिंदू धर्मात केली जातं नाही. दक्षिण भारतात, उडुपीजवळील पाजका या पवित्र ठिकाणी, परशुरामाचं स्मरण करणारं भव्य मंदिर आहे. जर तुम्ही भारताच्या पश्चिम किनारपट्टीकडे फिरायला गेल्यास तुम्हाला भगवान परशुरामाला समर्पित अशी अनेक मंदिरं दिसतील. (Parshuram Jayanti 2023 date poojan muhurat tithi and  Akshaya Tritiya 2023 in marathi)


परशुराम जयंती 2022 तारीख (Parshuram Jayanti 2023 date )


हिंदू पंचांगनुसार अक्षय्य तृतीयाच्या दिवशी म्हणजे शनिवार 22 एप्रिल 2023 ला भगवान परशुराम पृथ्वीवर अवतरले होते. याचा अर्थ अक्षय्य तृतीयेसोबतच शनिवारी परशुराम जयंतीदेखील आहे. 


परशुराम जयंती 2022 तिथी (Parshuram Jayanti 2023 tithi)


तृतीया तिथी सुरुवात : 22 एप्रिल 2023 सकाळी 07:49 वाजता
तृतीया तिथी समाप्त : 23 एप्रिल 2023 सकाळी 07:47 वाजता 


परशुराम जयंतीला पूजा (Parshuram Jayanti poojan)


या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे.
स्वच्छ आणि नीटनेटके कपडे घालून मंदिराला गंगेच्या पाण्याने पवित्र करा.
परशुराम आणि विष्णूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करा.
देवाला फुले, तांदूळ आणि इतर वस्तू अर्पण करा.
देवाला भोग अर्पण केल्यानंतर उदबत्ती दाखवून आरती करावी.


अमर हैं भगवान परशुराम


अश्वत्थामा बलिव्यासो हनूमांश्च विभीषण:।


कृप: परशुरामश्च सप्तएतै चिरजीविन:॥


सप्तैतान् संस्मरेन्नित्यं मार्कण्डेयमथाष्टमम्।


जीवेद्वर्षशतं सोपि सर्वव्याधिविवर्जित।।


हिंदू पुराणात भगवान परशुरामसोबतच हनुमानजी, अश्वत्थामा, कृपाचार्य,  ऋषी मार्कंडेय, राजा बळी, महर्षि वेदव्यास आणि विभीषण हे देवता आजही अमर आहेत असं मानलं गेलं आहे. 


 


हेसुद्धा वाचा - Akshaya Tritiya 2023 Date : अक्षय्य तृतीया 22 की 23 एप्रिल कधी आहे? जाणून घ्या योग्य तिथी, शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व


 


(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)