Paush Purnima January 2023: हिंदू धर्मात पौर्णिमेचं खास महत्त्व आहे.नवं वर्ष 2023 सुरु झालं असून या वर्षातील पहिली पौर्णिमा 6 जानेवारीला आहे. या दिवशी चंद्र पूर्ण रुपात असतो. तसेच देवी लक्ष्मीला पौर्णिमा प्रिय आहे. पौष पौर्णिमेला शुक्रवार आल्याने शुभ योग चालून आला आहे. त्यामुळे देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी हा दिवस उत्तम आहे. पंचांगानुसार, पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी 6 जानेवारीला पहाटे 2 वाजून 14 मिनिटांनी सुरु होईल. ही स्थिती पुढच्या दिवशी म्हणजेच 7 जानेवारीपर्यंत सकाळी 4 वाजून 37 मिनिटांपर्यंत असेल. उदय तिथीनुसार पौर्णिमा 6 जानेवारीला असणार आहे. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, ब्रह्म योग आणि इंद्र योग असा तिहेरी योग आहे. पौष पौर्णिमेचा चंद्रोदय संध्याकाळी 5 वाजता आहे. या दिवशी काही चुका केल्यास देवी लक्ष्मीची अवकृपा होऊ शकते. तसेच आर्थिक अडणींचा डोंगर उभा राहू शकतो. यासाठी या दिवशी काय करावं आणि काय करू नये, जाणून घेऊयात.  


देवी लक्ष्मीची अशी कराल पूजा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पौष पौर्णिमेला  देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी रात्री निशिता काळात पूजा करावी. देवी लक्ष्मी खीरेचा प्रसाद दाखवावा. कमळाचं फूल अर्पण करावं. लक्ष्मी अष्टक, कनकधारा स्तोत्र आणि श्रीसुक्ताचं पठण करावं. तसेच कमळ गुट्टाच्या माळेवर देवी लक्ष्मीचा जप करावा. रात्री चंद्राची पूजा करावी. चंद्रदेवांना दूध, जल आणि अक्षता यांचं अर्घ्य द्यावं. यामुळे चंद्र दोष दूर होतो आणि घरात सुख समृद्धी नांदते.


पौष पौर्णिमेला या चुका करू नका


  • पौर्णिमेला सकाळी लवकर उठून घराची साफसफाई करा. स्वच्छ घरात देवी लक्ष्मीचा वास असतो. मात्र सूर्यास्तानंतर साफसफाई करू नका. यामुळे देवी लक्ष्मी नाराज होते. कधीच संध्याकाळी आणि रात्री झाडू किंवा लादी पुसू नये.

  • अमावास्य आणि पौर्णिमा हिंदू धर्मात पवित्र आहे. या दिवशी तामसिक भोजन करू नयेत. जसं की, मांसाहार, दारू, लसूण, कांदा यांचं सेवन करू नये. यामुळे देवी लक्ष्मी नाराज होते.

  • देवी लक्ष्मीला कधीच तुळस अर्पण करू नयेत. तुळशीपत्र कायम भगवान विष्णुंना वाहलं जातं.

  • पौर्णिमेच्या रात्री दहीचं सेवन करणं नुकसानदायी असते. यामुळे आरोग्याशी निगडीत समस्या जाणवतात.

  • पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराची पूजा करा. मात्र पूजा करताना विशेष काळजी घ्यावी. अन्यथा अडचणीत वाढ होऊ शकते.


बातमी वाचा- Astro: वय उलटूनही लग्न जमता जमत नाही! ज्योतिषशास्त्रानुसार गुरूवारी करा हे उपाय


पौष पौर्णिमेला भद्रा योग


6 जानेवारी 2023 रोजी भद्रा योग आहे. हा योग सकाळी 7 वाजून 15 मिनिटांपासून सुरु होणार असून दुपारी 3 वाजून 24 मिनिटांपर्यंत असणार आहे. या काळात भद्रा स्वर्गात असणार आहे. धर्मशास्त्रानुसार, भद्रा स्वर्गात असल्याने अशुभ प्रभाव होत नाही.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)