Phulera Dooj 2023 : आजचा दिवस शुभ कार्यासाठी खूप खास, फुलेरा दूजचा मुहूर्त जाणून घ्या
Phulera Dooj 2023 Puja : आज फुलेरा दूजचा सण साजरा केला जाणार आहे. आजच्या दिवस अत्यंत शुभ मुहूर्तावर साजरा होणार आहे. या दिवसाचा शुभ मुहूर्त, शुभ योग आणि पूजाविधी जाणून घेऊया.
Phulera Dooj 2023 Puja in marathi : आज फुलेरा दूज...आजच्या दिवशी राधा - कृष्ण फुलांची होळी खेळतात. आजपासून ब्रजमध्ये होळीला सुरुवात होते. हिंदू पंचागंनुसार आजचा दिवस लग्नासाठी अतिशय शुभ मानला (phulera dooj 2023 vivah muhurat) जातो. असं म्हणतात आजच्या दिवशी कुठल्याही शुभ मुहूर्ताची गरज नसते. आज तुम्ही कुठल्याही शुभ कार्याला शुभारंभ करु शकता. फुलेरा दूज हा सण होळीचं प्रतीक म्हणून ओळखला जातो. फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसर्या तिथीला म्हणजेच फुलेर दुजाच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा अंश असतो. या कारणास्तव हा दिवस श्रीकृष्णाच्या उपासनेसाठी सर्वोत्तम मानला जातो. (Phulera Dooj 2023 Puja 21 february 2023 Muhurat Shubh Yoga Puja Vidhi flower holi festival Today is very special day for auspicious work Radha Krishna Puja in marathi)
फुलेरा दूज 2023 मुहूर्त (Phulera Dooj 2023 Muhurat)
पंचांगानुसार, फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाची दुसरी तिथी 21 फेब्रुवारी 2023 ला सकाळी 9.04 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 22 फेब्रुवारी 2023 ला सकाळी 5.57 वाजता समाप्त होईल. हिंदू शास्त्रानुसार फुलेरा दुजाचा सण हा संध्याकाळी साजरा केला जाणार आहे.
राधा-कृष्ण पूजा मुहूर्त - संध्याकाळी 06:20 - 06:45 PM (21 फेब्रुवारी 2023)
अभिजित मुहूर्त - 12.18 pm - 01.03 pm (21 फेब्रुवारी 2023)
फुलेरा दूज 2023 शुभ योग (Phulera Dooj 2023 Shubh Yoga)
फुलेरा दूजचा दिवस सर्व प्रकारचे दोष दूर करतो. अशा स्थितीत यावर्षी फाल्गुन दूज म्हणजेच फुलेरा दूजाच्या दिवशी तीन शुभ योग असणार आहेत. योग त्रिपुष्कर, सर्वार्थ सिद्धी आणि सिद्ध योग यांचा संयोग होत आहे. या तिन्ही योगांमध्ये नवीन कार्याची सुरुवात अत्यंत फलदायी मानली जाते.
सिद्ध योग - 21 फेब्रुवारी 2023, 06.57 am - 22 फेब्रुवारी 2023, 03.08 am
सर्वार्थ सिद्धी योग - सकाळी 06.38 - सकाळी 6.58 (21 फेब्रुवारी 2023)
त्रिपुष्कर योग - 21 फेब्रुवारी 2023, 09.04 am - 22 फेब्रुवारी 2023, 05.57 am
फुलेरा दूज पूजा विधी (Phulera Dooj Puja Vidhi)
फुलेरा दुजावर गोधुली मुहूर्तावर पूजा करण्याचा नियम आहे. राधा-कृष्णाची पूजा करण्याची उत्तम वेळ ही संध्याकाळची असते.
संध्याकाळी आंघोळ केल्यावर स्वच्छ आणि रंगीबेरंगी कपडे घाला. शक्य असल्यास गुलाबी रंगाचे कपडे परिधान करा. हा रंग प्रेमाचं प्रतीक मानलं जातं.
श्रीकृष्ण आणि राधेला फुलांनी सजवा. कुमुद, कारवरी, चणक, मालती, पलाश आणि वनमाला फुलं अर्पण करा.
राधा-कृष्णाला सुवासिक गुलाल आणि अबीर अर्पण करा. शुभ्र मिठाई, पंचामृत, मिश्रीचा नेवैद्य लावावा.
तुपाचा दिवा लावून 'मधुराष्टक' किंवा 'राधा कृपा कटाक्ष' पाठ करा. तुम्ही राधे कृष्णाच्या मंत्रांचाही जप करू शकता.
राधा राणीला मेकअपचे सामान अर्पण करा. मग ते दान करा.