Pishach Yog : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या स्थिती बदलामुळे कुंडलीतीत अनेक योग तयार होत असतात. काही योग हे अतिशय शुभ तर काही अशुभ असतात. याचा परिणाम 12 राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक दिसून येतो. न्यायदेवा शनिदेव आणि ग्रहांचा सेनापती मंगळ यांच्या युतीतून महाविनाशकारी असा पिशाच योग तयार झाला आहे. हा योग पुढील एक महिना असून 16 नोव्हेंबरपर्यंत याचा परिणाम दिसून येईल. या महाविनाशकारी पिशाच योगामुळे तीन राशींच्या आयुष्यात भूकंप येणार आहे. (pichach yog due to transit of saturn and mars these zodiac signs be careful)


वृषभ (Taurus Zodiac) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या राशीसाठी, पिशाच योगामुळे या लोकांना आरोग्याची समस्या जाणवणार आहे. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा अन्यथा अपघाताची शक्यता आहे. तुमचं शत्रू आणि विरोधक तुमचं नुकसान करण्यासाठी कटकारस्थान रचत आहेत. मालमत्तेबाबत वाद सुरु असल्यास तुम्हाला कठोर प्रसंगाना समोरे जावं लागणार आहे. या काळात जोखमीचे निर्णय घेणे टाळा अन्यथा आयुष्यात नकारात्मक परिणाम भोगावे लागतील. 


तूळ (Libra Zodiac)


या राशीसाठी मंगळ आणि शनि यांच्यामध्ये तयार झालेला पिशाच योग आर्थिक बाबतीत घातक ठरणार आहे. उत्पन्नात वाढ असली तरी दुसऱ्या हाताने डबल पैसा खर्च होणार आहे. त्यामुळे तुमचं बँक बॅलेन्स गडबडणार आहे. आरोग्याचीही समस्या तुम्हाला या काळात त्रासदायक ठरणार आहे. जवळच्या नातेवाईकाचा अविश्वास आणि अव्यवहार्यपणामुळे तुम्हाला मानसिक त्रास भोगावा लागणार आहे. या काळात तुम्ही कोणावरही अतिआत्मविश्वास ठेवू नका अन्यथा तुम्हाला मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल. तुमच्या मुलांच्या आरोग्याबाबतही तुम्ही चिंतेत असणार आहात. 


मकर (Capricorn Zodiac)


या राशीच्या लोकांना पुढील 1 महिना पिशाच योगामुळे नुकसानदायक असणार आहे. कौटुंबिक जीवनात उलथापालथ होणार आहे.  तुमच्या नात्यात तणाव वाढणार आहे. तुमची आर्थिक स्थिती या काळात खराब होणार आहे. या आयुष्यात असे प्रसंग येणार आहे, ज्यामुळे तुम्हाला अचानक मोठी रक्कम खर्च करावी लागणार आहे. त्यामुळे या काळात आर्थिक व्यवहार करताना खूप काळजी घ्या. नाही तर मोठ्या संकटात सापडू शकता. या काळात वाणी आणि रागावर नियंत्रण ठेवणे तुमच्यासाठी हिताच होईलच. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)