Pitru Paksha 2023 : पितृपक्ष पंधरवडा सुरु झाला आहे. या काळात पितरांच्या शांती आणि तृप्तीसाठी पिंडदान, तर्पण आणि श्राद्ध केलं जाते. महाराष्ट्रात तिथीनुसार पितरांचं श्राद्ध केलं जातं. पितरांच्या आशीवार्दामुळे आयुष्यातील अडचणी दूर होतात अशी मान्यता आहे. पितृपक्षात गाय नाही, श्वान नाही तर कावळ्याला अतिशय महत्त्व असतं. महाराष्ट्रात श्राद्धाची वाडी कावळ्याला दिली जाते. इतर वेळी अंगणात काव काव करणाऱ्या कावळ्याला आपण हकलून लावतो. (pitru paksha importance of crow Relationship between crow, wad and pimpal tree video)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्ञानेश्वरीत माऊली म्हणतात, 'पैल तो गे काऊ कोकताहे, शकुन गे माये सांगताहे' याचा अर्थात कावळ्याची काव काव शकुन आहे. याच कावळ्याला पितृपक्षात अतिशय मान असतो. मग यामागील शास्त्रीय कारण तुम्हाला माहिती आहे का? कावळा, वड आणि पिंपळ यांच्या एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहे. चला ज्योतिषशास्त्र तज्ञ्ज आनंद पिंपळकर यांनी कावळ्याचे महत्त्व समजून सांगितलं आहे. 


पित्रात कावळ्यांना खाऊ घातल्याने ऑक्सिजन वाढतो...?


वड आणि पिंपळ हे दोन वृक्ष असं आहेत जे एकाच वेळी दुपटीने ऑक्सिजन निर्माण करत असतात. जगात सर्व झाडांची रोप ही बीज प्रक्रियेद्वारे आपण लावू शकतो. पण वड आणि पिंपळ ही दोन वृक्ष अशी आहेत की, ती बीज निर्मितीने होऊ शकतं नाही. 


हेसुद्धा वाचा - Pitru Paksha 2023 : पितृ पक्षात 30 वर्षांनी अद्भूत योग! 'या' 5 राशी होणार श्रीमंत


मग या झाड्यांची लागवड कशी होते?


तर या दोन्ही झाडांची कोमल अंकुर स्वरुपाची फळं जेव्हा कावळा खातो. ही फळं इतर पक्षी खात नाहीत, हे महत्त्वाचं आहे. तेव्हा तो अंकुर कावळ्याच्या पोटात जातो. त्यानंतर कावळा विष्ठा करतो तिथे वड किंवा पिंपळ झाड उगवतं. याचा अर्थ कावळ्यांशिवाय ही झाडं टिकणार नाही किंवा वाढणार नाही. त्यामुळे कावळ्यांचं संवर्धन होणं गरजेचं आहे. 



तर दुसरं महत्त्वाचं म्हणजे कावळ्याचं अंडी घालण्याचं काम असतं ते भाद्रपद महिन्यात असतं. त्यामुळे त्यांना पोषक आहार मिळावा आणि सृष्टीचक्र व्यवस्थीत चालावं म्हणून पितृपक्षात कावळ्याला महत्त्व आहे. 


हेसुद्धा वाचा - Pitru Paksha 2023 : पितृऋण आणि पितृदोष यात मोठा फरक; श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान म्हणजे काय?


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)