Astrology : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह विशिष्ट वेळी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. ग्रहांच्या या बदलाचा परिणाम प्रत्येक राशीच्या व्यक्तींवर होताना दिसतो. आगामी काळात गुरू आणि सूर्यासह 3 ग्रहांच्या चालीमध्ये बदल होणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

4 सप्टेंबरला शुक्र कर्क राशीत तर गुरू मेष राशीत वक्री झाला आहे. तर 16 सप्टेंबरला बुध सिंह राशीत प्रवेश करणार आहे. 17 सप्टेंबरला सूर्य कन्या राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी असून महिन्याच्या शेवटी 24 सप्टेंबरला मंगळ कन्या राशीत अस्त होणार आहे.


अशा स्थितीत ग्रहांच्या हालचालीतील सर्व 12 राशींवर परिणाम दिसून येईल. मात्र यावेळी अशा 3 राशी आहेत ज्यांचं नशीब या काळात चमकू शकतं. जाणून घेऊया या 5 ग्रहांच्या बदललेल्या चालीचा कोणत्या राशींच्या व्यक्तींना सकारात्मक परिणाम मिळणार आहे. 


धनु रास (Dhanu Zodiac)


धनु राशीच्या लोकांसाठी गुरु, सूर्यासह 3 ग्रहांच्या चालीतील बदल फायदेशीर ठरू शकतात. यावेळी तुमचं उत्पन्न वाढू शकते. प्रगतीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्ही यावेळी प्रवास देखील करू शकता. यावेळी तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील.


मकर राशि (Makar Zodiac)


गुरु आणि सूर्यासह 3 ग्रहांच्या चालीतील बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. नोकरदारांना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. या काळात तुम्हाला नशिबाचीही पूर्ण साथ मिळणार आहे. तुमच्या इच्छेनुसार शुभ परिणाम प्राप्त करण्यात तुम्ही यशस्वी होणार आहात. तुम्ही काही नवीन लोकांशीही संबंध जोडू शकता. तुमची कोणतीही महत्त्वाची योजना यशस्वी झाल्यास तुम्ही आनंदी होणार आहात. तुम्हाला मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल.


मिथुन रास (Mithun Zodiac)


गुरु, सूर्यासह 3 ग्रहांच्या चालीतील बदल तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या शुभ सिद्ध होणार आहे. तुम्हाला मालमत्तेच्या व्यवहारात फायदा होऊ शकतो. तुमची संपत्ती आणि सन्मान वाढेल. लोक तुमच्यापासून प्रभावित होतील. कामाच्या ठिकाणी प्रगती आणि उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना यावेळी नवीन ऑर्डर मिळू शकतात. अचानक तुमची धार्मिक कार्यात रुची वाढणार आहे.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )