मुंबई : वास्तुशास्त्राने अशा अनेक वनस्पतींची माहिती दिली आहे, जी तुमच्या घरात लावल्याने यशाची सुरुवात सकारात्मक उर्जेने होते. या वनस्पतींचा आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होतो. तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका रोपाबद्दल सांगणार आहोत, ज्याची लागवड केल्याने तुम्हाला यश मिळण्यासाठी सकारात्मक उर्जा मिळू शकते. या वनस्पतीचे नाव अपराजिता आहे. संस्कृतमध्ये या वनस्पतीला विष्णुप्रिया, विष्णुकांता, गिरीकर्णी, अश्वखुरा असे म्हणतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अपराजिता दोन रंगांची आहे, पहिला पांढरा आणि दुसरा निळा. अपराजिता हा वेल आहे. त्याला मनी वेल असेही म्हणतात. अपराजिताची वेल जसजशी वाढत जाते, तसतशी संपत्ती, समृद्धी आणि भरभराट होते, असे मानले जाते. चला तर मग जाणून घेऊया निळ्या अपराजिता आणि 


पांढऱ्या अपराजिताचे फायदे.


पांढरी अपराजिता पांढर्‍या रंगाची वनस्पती धनलक्ष्मीला आकर्षित करते. अपराजिताचे रोप घरात लावल्याने व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचा त्रास होण्याची शक्यता कमी होते. हा वेल घरात लावल्याने सुख-शांती राहते आणि धन आणि अन्नधान्याची कमतरता भासत नाही.


आपले सौंदर्य वाढवण्यासाठी लोक आपल्या बागेत निळ्या रंगाच्या फुल येणारे अपराजिताचा वेल लावतात. ही वनस्पती संपत्ती आणि लक्ष्मीलाही आकर्षित करते. याशिवाय घरामध्ये निळी अपराजिता लावल्याने घरातील सदस्यांची बुद्धी वाढते. अशीही एक मान्यता आहे की त्याचे फूल भगवान विष्णूला अर्पण केल्यास कुटुंबाला कधीच अपयश येत नाही. याशिवाय शनिदेवाला निळ्या अपराजिताची फुले अर्पण केल्याने शनिदेवाची साडेसाती किंवा महादशा यामुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळते.


या दिशेला लावावा हा वेल


वास्तूनुसार घराच्या उत्तर दिशेला हा वेल लावल्यास फायदा होतो. असे केल्याने शुभ फळ मिळते आणि घरात सुख-समृद्धी टिकून राहते. मात्र, हा वेल कधीही पश्चिम किंवा दक्षिण दिशेला लावू नये.