Chaturgrahi Yog: 55 वर्षानंतर बनतोय ‘पॉवरफुल चतुर्ग्रही योग’, `या` राशींचं चमकू शकतं नशीब
Four Planet Sanyog: मीन राशीमध्ये सूर्य ग्रहांचा राजा, बुद्धिमत्ता आणि व्यवसाय देणारा बुध, मायावी ग्रह राहू आणि संपत्ती देणारा शुक्र यांचा संयोग आहे. त्यामुळे चतुर्ग्रही योग तयार होत आहे.
Four Planet Sanyog: प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. या ग्रहांच्या राशी बदलामुळे अनेक योग तयार होतात. यावेळी ग्रहांच्या त्रिग्रही आणि चतुर्ग्रही योग तयार होतात. यावेळी त्याचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होताना दिसतो. आगामी काळात चतुर्ग्रही योग तयार होणार आहे.
मीन राशीमध्ये सूर्य ग्रहांचा राजा, बुद्धिमत्ता आणि व्यवसाय देणारा बुध, मायावी ग्रह राहू आणि संपत्ती देणारा शुक्र यांचा संयोग आहे. त्यामुळे चतुर्ग्रही योग तयार होत आहे. हा योग तयार झाल्याने काही राशींच्या आयुष्यात आनंदाचे आणि सुखाचे क्षण येणार आहेत. जाणून घेऊया कोणत्या राशींना यावेळी लाभ मिळणार आहे.
वृषभ रास (Taurus Zodiac)
वृषभ राशीच्या लोकांसाठी चार ग्रहांचे एकत्रीकरण फायदेशीर ठरू शकते. हा संयोग तुमच्या राशीतून उत्पन्न आणि लाभाच्या ठिकाणी तयार होणार आहे. तुम्हाला यावेळी चांगला नफा होऊ शकतो. पैशाशी संबंधित समस्याही संपुष्टात येतील. गुंतवणुकीतून नफा मिळण्याचीही शक्यता आहे. कुटुंबाशी चांगले संबंध प्रस्थापित होणार आहेत. अनपेक्षित आर्थिक लाभही होऊ शकतो.
मिथुन रास (Mithun Zodiac)
चतुर्ग्रही योगाची निर्मिती मिथुन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. तुमच्या राशीतून दशम स्थानात हा योग तयार होणार आहे. सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या लोकांना नोकऱ्या मिळू शकतात. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. राजकारणाशी संबंधित असाल तर निवडणूक जिंकू शकता. अनपेक्षित पैसे मिळू शकतात.
धनु रास (Dhanu Zodiac)
धनु राशीच्या लोकांसाठी चार ग्रहांचा संयोग शुभ ठरू शकतो. कारण हा योग तुमच्या राशीतून चौथ्या घरात तयार होणार आहे. जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या काळात असे करणे फायदेशीर ठरू शकते. तुम्ही कोणतीही मालमत्ता आणि वाहन खरेदी करू शकता. तुम्ही मनाने पूर्णपणे आनंदी व्हाल. आईशी तुमचे संबंध चांगले राहतील. अनेक प्रलंबित कामे पूर्ण झाल्यास तुम्ही आनंदी होणार आहात.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )