Pradosh Vrat And Masik Shivratri in December 2022 : आज शुभ योग आहे. त्यात हा दुर्मिळ शुभे योग असल्याने काही राशींच्या लोकांसाठी खास असणार आहे.  प्रदोष व्रत आणि मासिक शिवरात्रीमुळे भगवान शंकराचा आशीर्वाद मिळविण्याचा शुभ योग आहे. आज, बुधवारी 21 डिसेंबर 2022 रोजी हा योग येत आहे. आजचा शुभ योग काही राशींसाठी भाग्यवान ठरू शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भोलेनाथांचा आशीर्वाद मिळण्याची ही मोठी संधी आहे. आज हा अतिशय शुभ योगायोग आहे. आज पौष महिन्याचे प्रदोष व्रत आणि मासिक शिवरात्री एकत्र येत आहेत. अशावेळी एक उपवास ठेवल्यास दोन्ही उपवासाचे फल प्राप्त होते. तसेच, हा शुभ संयोग काही राशींसाठी चांगला परिणाम देईल.


प्रदोष व्रत आणि मासिक शिवरात्री योग


प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशी तिथीला पाळले जाते. तर मासिक शिवरात्री दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरी केली जाते. अशावेळी पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी 20 ते 21 डिसेंबर दरम्यान रात्री 12.45 वाजता सुरु होईल आणि 21 डिसेंबरच्या रात्री 10.16 वाजता समाप्त होईल. दुसरीकडे, पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी 21 डिसेंबरच्या रात्री  10.16 वाजता सुरू होईल आणि 22 डिसेंबरच्या रात्री7.13 पर्यंत राहील. परंतु 22 डिसेंबरच्या संध्याकाळी मासिक शिवरात्रीच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त न मिळाल्याने मासिक शिवरात्रीची पूजा 21 डिसेंबरच्या रात्रीच होणार आहे. अशा प्रकारे प्रदोष व्रत आणि मासिक शिवरात्री एकाच दिवशी साजरी केली जाईल.  


या राशीच्या लोकांना मोठा लाभ


वृषभ - या दुर्मिळ योगामुळे आज वृषभ राशीच्या लोकांच्या कामावर त्यांचा बॉस खूश राहू शकतो. नोकरीत लाभ होईल. व्यावसायिकांनी कामात पूर्ण लक्ष दिल्यास फायदा होण्याची शक्यता आहे. घरात आनंदाचे वातावरण राहील. 


मिथुन - प्रदोष व्रत आणि मासिक शिवरात्री योगामुळे मेहनतीचे फळ मिळण्याची वेळ आली आहे. करिअरमध्ये मोठी संधी मिळेल. त्यामुळे आनंद होईल. व्यापाऱ्यांनाही फायदा होईल. मोठा करार अंतिम असू शकतो. तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते. 


सिंह - एक मोठा योग जुळून येत असल्याने करिअरच्यादृष्टीने दिवस खूप चांगला आहे. विशेषतः नवीन लोकांना याचा फायदा होईल. मेहनतीचे पूर्ण फळ मिळाल्याने आनंद होईल. व्यवसायात तेजी येईल. त्यामुळे धनलाभ होईल.


मीन - आजच्या दुर्मिळ योगामुळे आपल्या कुशाग्र मनाच्या जोरावर काम पूर्ण होईल. अवघड कामेही पूर्ण कराल. वेळ तुमच्या बाजूने आहे. गुंतवणुकीसाठी चांगला काळ. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)