Chaitra Pradosh Vrat 2023 Date : हिंदू धर्मात प्रत्येक दिवस एका देवाला समर्पित करण्यात आला आहे. तसंच प्रत्येक देव देवतांसाठी करण्यात येणारे व्रतही ठरविण्यात आले आहेत. चैत्र महिना सुरु आहे. या महिन्यात प्रदोष व्रत केलं जातं. हे व्रत भगवान शिव आणि माता पार्वतीला समर्पित करण्यात आलं आहे. हे व्रत केल्याने रोगराई, दोष आणि दु:ख दूर होतं अशी मान्यता आहे. यावेळची प्रदोष व्रत खूप खास आहे. असे हे व्रत कधी आहे, पूजा विधी, मुहूर्त सगळ्याबद्दल जाणून घेऊयात...(pradosh vrat 2023 chaitra ravi pradosh vrat 2023 date march 19 puja tithi method muhurta importance benefit in marathi)


कधी आहे प्रदोष व्रत? (Chaitra Pradosh Vrat 2023 Date)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चैत्र महिन्यातील पहिला प्रदोष व्रत रविवार, 19 मार्च 2023 ला पाळण्यात येणार आहे. प्रदोष व्रत रविवारी आल्यामुळे त्याला रवी  प्रदोष व्रत असंही म्हटलं जातं. यादिवशी शिवलिंगावर संध्याकाळी दूध, दही, तूप, मध, गंगाजल यांचा अभिषेक करणाऱ्या व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात अशी मानता आहे. 


चैत्र रवि प्रदोष व्रत 2023 मुहूर्त (Chaitra Pradosh Vrat 2023 Muhurat)


पंचांगानुसार व्रत - 19 मार्च 2023 सकाळी 08:07 वाजता सुरु होणार 
व्रत समाप्ती - 20 मार्च 2023 रोजी पहाटे 04:55 वाजता समाप्त


ज्योतिषाशास्त्राने सांगितल्या प्रमाणे या दिवशी प्रदोष काल म्हणजेच सूर्यास्ताच्या 45 मिनिटं आधी सुरू होणारी आणि सूर्यास्तानंतर 45  मिनिटांनी समाप्त होणारी शिवपूजा अत्यंत फलदायी ठरते. 


शिवपूजेची वेळ - संध्याकाळी 06:31 - रात्री 08:54 (19 मार्च 2023)


पूजेचा कालावधी - 2 तास 23 मिनिटे