Pushya Nakshatra : दिवाळी हा सण हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. दिवाळीला आता अवघे काही दिवस उरले आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार, दिवाळीच्या काही दिवस आधी म्हणजेच 4 आणि 5 नोव्हेंबरला एक अत्यंत दुर्मिळ योगायोग घडतोय. असा योगायोग सुमारे 400 वर्षांनंतर घडल्याचं दिसून येतंय. दिवाळीपूर्वी तुम्हाला खरेदी, गुंतवणूक यासारखे कोणतेही शुभ काम करायचे असेल तर ते या दोन दिवसांत करू शकता. जाणून घ्या यामुळे कोणत्या राशींना मिळणार विशेष लाभ.


4 आणि 5 नोव्हेंबर रोजी हे दुर्मिळ संयोग होतोय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, शनिवारी म्हणजेच 4 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून पुष्य नक्षत्र सुरू होणार आहे. हा योग 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता संपणार आहे. अशा स्थितीत शनि पुष्य आणि सूर्य पुष्य नक्षत्र असणार आहे. 


शनि पुष्य व्यतिरिक्त हा योग 4 नोव्हेंबरला तयार होतोय


ज्योतिष्य शास्त्रानुसार शनिवार, 4 नोव्हेंबर 2023 रोजी पुष्य नक्षत्रासोबत गजकेसरी योग तयार होतोय. याशिवाय पुष्य नक्षत्राचा स्वामी शनिही स्वतःच्या राशीत असतो. यासोबतच शश राजयोग तयार होतोय. 


५ नोव्हेंबरला रविपुष्यासोबत हे योग तयार होतायत


5 नोव्हेंबर रोजी रविपुष्य योगासह रवियोग, सर्वार्थ सिद्धी योग, गजकेसरी योगासह शुभ, श्रीवत्स, अमला, वाशी, सरल योग तयार होतोय. ज्योतिषशास्त्रानुसार, शनी स्वतःच्या राशीत कुंभ राशीमध्ये स्थित आहे आणि गुरू मेष राशीमध्ये विराजमान आहे. अशा परिस्थितीत दोघांची परिस्थिती एक शुभ संयोग निर्माण करतायत. हा योग अत्यंत शुभ मानला जात असून वृषभ, मेष, तूळ, धनु आणि कुंभ राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो.


या राशींना दुर्मिळ योगायोगाचा मिळणार लाभ


ज्योतिष शास्त्रानुसार, दिवाळीच्या आधी तयार झालेला हा योग काही राशींसाठी लाभदायक 
ठरणार असून शनि आणि गुरूचा अपार आशीर्वाद देईल. अशा स्थितीत मेष, मिथुन, कर्क, धनु, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकणार आहे. या काळात व्यवसाय आणि नोकरीतही प्रगतीची पूर्ण शक्यता आहे.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)