Rahu Sun Conjunction 2024: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह वेळोवेळी त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. या शास्त्रामध्ये राहूला मायावी ग्रह मानलं जातं. हा अशुभ ग्रह राहु ठराविक काळानंतर राशी बदलतो. यावेळी राहू मीन राशीमध्ये स्थित आहे. ग्रहांचा राजा सूर्य देखील या राशीत प्रवेश करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

14 मार्च रोजी दुपारी 12:46 वाजता सूर्य मीन राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत राहू आणि सूर्याचा संयोग आहे. राहू आणि सूर्य या दोन्ही ग्रहांचं मिलन काही राशींसाठी लाभदायक ठरणार आहे. या काळात काही राशींना आर्थिक लाभ होतील, तर काहींना दिर्घकाळापासून असलेल्या समस्या दूर होणार आहेत. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत. 


वृषभ रास (Vrishbha Zodiac)


या राशीमध्ये दोन्ही ग्रहांचा संयोग अकराव्या भावात होणार आहे. व्यावसायिक जीवनात भरपूर यश मिळण्याची शक्यता आहे. मित्राच्या मदतीने तुम्हाला एखादा मोठा प्रोजेक्ट मिळू शकतो. करिअरच्या बाबतीत काही चांगली बातमी मिळू शकणार आहे. कामाच्या ठिकाणाबाबत बोलायचं झालं तर तुमचं काम पाहून वरिष्ठ अधिकारी खुश होणार आहेत. तुम्हाला आगामी काळात पदोन्नती, वेतनवाढ किंवा वाढ मिळू शकते. तुमच्या विचारांनी इतरांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकू शकता. 


सिंह रास (Leo Zodiac)


या राशीसाठी राहू आणि सूर्याचा संयोग सहाव्या घरात होतोय. या राशीच्या लोकांसाठी हे वरदानापेक्षा कमी सिद्ध होणार नाही. तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही अनेक क्षेत्रात यश मिळवू शकता. अडकलेले पैसेही परत मिळू शकतात. कामं आणि योजनांमध्ये यश मिळेल. तुम्हाला व्यवसायात प्रचंड यश मिळू शकतं. भागीदारीत केलेल्या व्यवसायातही यश मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक समस्यांपासून सुटका मिळणार आहे. 


मकर रास (Makar Zodiac)


मकर राशीमध्ये सूर्य आणि राहूचा संयोग तृतीय भावात होणार आहे. उत्पन्नाचे नवे स्त्रोत खुले होणार आहेत. कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचा वेळ चांगला जाईल. यश आणि आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम राहणार आहे. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळेल.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )