Rajbhang-Budhaditya Rajyog : ज्योतिषशास्त्रात ग्रह, नक्षत्र आणि राशींना खूप महत्त्व देण्यात येतं. प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळी राशी बदलत असतो. अनेकदा असं घडतं की, राशीमध्ये एखादा ग्रह असेल तर दोन ग्रहांचा संयोग तयार होतो. यावेळी राजयोगाची निर्मिती होते. दरम्यान या राजयोगाचा परिणाम काही राशींच्या लोकांवर होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सावन महिन्यात दोन विशेष राजयोग तयार होताना दिसतायत. यामध्ये राजभंग आणि बुधादित्य राज योग तयार होणार आहेत. यामुळे काही राशींच्यावर आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्य आणि शुक्राच्या संयोगामुळे राजभंग योग आहे. तर दुसरीकडे सूर्य आणि बुध यांच्या संयोगाने बुधादित्य राजयोग निर्माण होतोय. जाणून घेऊया या दोन्ही राजयोगांचा कोणत्या राशींवर सकारात्मक परिणाम होणार आहे. 


तूळ रास


तूळ राशीच्या लोकांसाठी दे दोन्ही राजयोग शुभ सिद्ध होऊ शकतात. विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरमध्ये यश मिळण्याची अपेक्षा आहे. पदोन्नती आणि वेतनवाढ होऊ शकते. व्यावसायिकांना अचानक फायदा होऊ शकतो. विद्यार्थी कोणत्याही परीक्षेत यश मिळवू शकतात. नोकरदारांसाठी काळ अनुकूल राहील.  सरकारी क्षेत्रातही मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असलेल्यांना नोकरी मिळू शकणार आहे. 


कर्क रास


राजभंग राजयोग आणि बुधादित्य राजयोग या राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरणार आहे. नोकरी व्यवसायातील लोकांसाठी काळ अनुकूल राहील. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. सामाजिक आणि धार्मिक कार्यात रस आणि समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल. जोडीदारासोबत फिरण्याची योजना बनवता येईल. विवाहित लोकांसाठी हा कालावधी योग्य आहे. 


सिंह रास


सूर्य आणि बुध यांचा संयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. त्याचप्रमाणे राजभंग राजयोग देखील तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येणार आहे. तुम्हाला तुमच्या जीवन साथीदाराची साथ मिळेल. तुम्हाला नवीन काम सुरू करायचे असल्यास ते करू शकता. बेरोजगारांना या काळात नोकरी मिळू शकते. तुमचे रखडलेले काम या काळात पूर्ण होईल. 


मीन रास


मीन राशीच्या लोकांसाठी बुधादित्य राजयोग शुभ सिद्ध होणार आहे. या काळात कोर्ट केसेसमध्ये यश मिळू शकते. व्यावसायिकांसाठी काळ अनुकूल आहे. कौटुंबिक वातावरणाच्या दृष्टीने हा काळ चांगला जाणार आहे. अचानक आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. जे अविवाहित आहेत, त्यांचे लग्न होईल.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )