Raksha Bandhan 2024 : श्रावणातील महत्त्वाचा सण म्हणजे राखी पौर्णिमा. राखी म्हणजे रक्षा करणे. एक महत्त्वाची जबाबदारी स्वीकारणे यात आपुलकीची, प्रेमाची, कल्याणाची भावना आहे. प्राचीन काळी रजपूत स्त्रिया मोठ्या धैर्याने युद्ध प्रसंगी शत्रूच्या गटात जात आणि आपल्या पतीबरोबर, भावाबरोबर युद्ध करणाऱ्या वीर जवानांना आपला बंधू मानून राखी बांधत. त्यामुळे युद्धप्रसंग टळत. या पवित्र आणि व्यापक भावनेमुळेच हा सण भारतीय परंपरेत रुजला असावा. (Raksha Bandhan 2024 19 august Dont miss Raksha Bandhan shubh muhurat tie rakhi)


राखी पौर्णिमेची कथा जाणून घ्या!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इतिहासात एक प्रसिद्ध कथा आहे. सिकंदर नावाचा पराक्रमी राजा होता. या महत्त्वाकांक्षी राजाने आपल्या भारतावर स्वारी केली. झेलम नदीपर्यंतचा सर्व प्रदेश त्याने जिंकला. त्याला पुढे यायचे होते पण पावसाळा असल्याने झेलम नदी दुथडी भरून वाहत होती. नदीला उतार पडत नव्हता, पूर ओसरत नव्हता. सिकंदर स्वत: झेलम नदी पाहण्यासाठी पुढे आला. याच वेळी नदीच्या काठावर सावित्री नावाची स्त्री आपले रक्षण व्हावे म्हणून नदीची पूजा करीत होती. नदीला राखी अर्पण करीत होती.


सिकंदराने ते पाहिले मोठ्या कुतुहलाने त्याने सावित्रीला पूजा, राखी याबद्दल विचारलं. सावित्रीने सिकंदरला या राखीचे महत्त्व सांगून तिने सिकंदराने पोरस राजावर स्वारी केली. पोरस राजाचा पराभव झाला. पोरस हा सावित्रीला पूजा, राखी याबद्दल विचारलं.


सावित्रीने सिकंदराला या राखीचे महत्त्व सांगून तिने सिकंदराच्या हातात राखी बांधली. सिकंदर सावित्रीचा राखीभाऊ झाला. पुढे सिकंदराने पोरस राजावर स्वारी केली. पोरस राजाचा पराभव झाला. पोरस हा सावित्रीचा भाऊ आहे, हे सिकंदराला समजले तेव्हा त्याने पोरसला सोडून दिलं. सिकंदराने पोरसराजाचे राज्यगी परत दिलं. अशाप्रकारे सिकंदर सावित्रीचा भाऊ झाल्याने सर्वांचे कल्याण झालं संकट टळलं. 


रक्षाबंधन तिथी!


मराठी पंचांगानुसार रक्षाबंधन म्हणजे राखी पौर्णिमा तिथी ही तिसऱ्या श्रावण सोमवारी 19 ऑगस्ट 2024 ला पहाटे 3.04 वाजेपासून रात्री 11.55 वाजेपर्यंत आहे. रक्षाबंधनाला सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग आणि शोभन योग आहे. 


हेसुद्धा वाचा - Raksha Bandhan Wishes in Marathi : लाडक्या बहीण भावामधील नातं अधिक मधुर करण्यासाठी पाठवा 'हे' खास मराठीतून शुभेच्छा


'या' वेळेत राखी बांधू नका!


राखी पौर्णिमेवर भद्रकाळ 19 ऑगस्टला दुपारी 1:30 पर्यंत असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार भद्रकाळात राखी बांधणे अशुभ मानलं जातं. भद्र काळात चुकूनही राखी बांधू नये, ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ सांगतात. 


रक्षाबंधनापासून पंचकाची सुरुवात


तिसऱ्या श्रावण सोमवारी म्हणजेच राखी पौर्णिमेच्या दिवसापासून 5 दिवस पंचक असणार आहे. हिंदू धर्मात पंचक काळ हा अशुभ मानला जातो. या काळात शुभ कार्य केलं जातं नाही. यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी सायंकाळी 7 वाजल्यापासून पंचक सुरू होत आहे. पण तुम्हाला जाणून आनंद होईल की, यंदाचा पंचक हे राजपंचक असल्याने ते शुभ मानले जाते. त्यामुळे रक्षाबंधन सणावर त्याचा परिणाम होणार नाही. 


रक्षाबंधन शुभ मुहूर्त 


रक्षाबंधनाला राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त दुपारी 1.30 ते रात्री 9.08 पर्यंत असणार आहे. या वेळेत राखी बांधणे शुभ मानले जाणार आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)