Surya Nakshatra Parivartan 2023 : ग्रहांचा राजा सूर्यदेव नक्षत्र बदल (Sun Nakshatra Transit) करणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहांचं नक्षत्र बदलणे अतिशय शुभ मानले जाते. पंचांगानुसार रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे  31 ऑगस्ट सूर्यदेव आपलं नक्षत्र बदलणार (Sun Transit 2023) आहे. सूर्यदेव सध्या मघा नक्षत्रात असून तो 31 ऑगस्टला पूर्व फागुनी नक्षत्रात गोचर करणार आहे. सूर्य ग्रह 31 ऑगस्ट रोजी रात्री 9:44 वाजता नक्षत्र बदल करणार आहे. त्यामुळे काही लोकांच्या आयुष्यात सुख समृद्धी नांदणार आहे. (raksha bandhan sun nakshatra transit 2023 on august 31 Sun Transit 2023 these 4 zodiac signs will change life surya gochar 2023)


वृषभ (Taurus) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूर्य शुक्राचे अधिपत्य असलेल्या नक्षत्रात परिवर्तन करत आहे. त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. वडील मुलाच्या नात्यात गोडवा येणार आहे. करिअरमध्ये विशेष लाभ होणार आहे. मालमत्ता खरेदीसाठी हा काळ शुभ ठरणार आहे. तुम्हाला मोठा लाभ होणार आहे. 


मिथुन (Gemini)


या राशीच्या लोकांना सूर्याच्या या संक्रमणामुळे वरदान ठरणार आहे. नवीन प्रकल्पात यश मिळणार आहे. तुम्हाला धनलाभाचे योग आहेत. व्यवसायिकांना चांगला नफा मिळणार आहे. नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी चांगला काळ आहे. पैशांचा स्त्रोत वाढणार आहे. प्रत्येक कामात यश मिळणार आहे. 


कर्क (Cancer)


या राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. स्पर्धात्मक परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळणार आहे. हा काळ तुमच्यासाठी सुवर्णकाळ असणार आहे. तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळणार आहे. या काळात मात्र रागावर नियंत्रण ठेवा. 


वृश्चिक (Scorpio)


या राशीच्या लोकांसाठी खूप फलदायी ठरणार आहे. व्यवसायात यश मिळेल आणि नशीब तुम्हाला साथ मिळणार आहे. समाजात तुमचं स्थान प्राप्त होणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्ही काहीही नवीन करणार आहात. बॉसकडून तुमची प्रशंसा होणार आहे. व्यावसायिकांना चांगला फायदा होणार आहे. करिअरमध्ये सकारात्मक परिणाम दिसणार आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमची नेतृत्व क्षमता वाढणार आहे. 


हेसुद्धा वाचा - September Grah Gochar 2023 : सप्टेंबर महिन्यात 5 ग्रहांचं गोचर! 'या' राशींना धनलाभासह कुटुंबात नांदेल सुख


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)