Rang Panchami 2023 in marathi : देशभरात मोठ्या उत्साहात होळी (holi 2023) आणि धुलिवंदन साजरा करण्यात आला. रंगाचा उत्सव प्रत्येकाला आवडणारा असतो. रंग खेळून तुमचं (rang panchami 2023 mumbai) मन भरलं नसेल तर रंग पंचमीलाही तुम्ही रंगांची उधळण करु शकता. कधी आहे रंग पंचमी आणि धुलिवंदन झाल्यानंतरी का साजरा केला जातो रंग पंचमीचा हा उत्सव, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना. तर रंगपंचमीचं महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधीबद्दल आपण जाणून घेऊयात. (Rang Panchami 2023 date shubh muhurat puja vidhi in marathi)


कधी आहे रंग पंचमी?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाच्या पाचव्या दिवशी रंग पंचमी साजरी केली जाते. धुलिवंदन झाल्यावर पाच दिवसांनी हा सण येतो. यंदा रंग पंचमीचा सण 12 मार्च 2023 रविवारी असणार आहे. हा उत्सव महाराष्ट्र (rang panchami 2023 maharashtra), राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये साजरा केला जातो. महाराष्ट्रातील नाशिकमध्ये रंगपंचमी रंग खेळला जातो. तर इंदूरमध्ये रंगपंचमीला मोठी मिरवणूक काढली जाते. 


रंगपंचमी - रविवार  12 मार्च 2023 (Rang Panchami 2023 Date)


रंगपंचमी शुभ मुहूर्त (Rang Panchami 2023 shubh muhurat)


शुभ मुहूर्त - 11 मार्च 2023 रात्री 10.5 पासून 12 मार्च 2023 रात्री 10.01 पर्यंत असणार आहे. 


रंगपंचमी पूजा विधी (Rang Panchami Puja Vidhi)


रंगपंचमीला राधाकृष्णा आणि लक्ष्मी नारायण यांची विशेष पूजा केली जाते.तर यांची पूजाविधीबद्दल जाणून घेऊयात


प्रथम राधाकृष्ण किंवा लक्ष्मी नारायण यांची विधीवत पूजा करा. 


उत्तर दिशाला या देवतांची पूजा मांडणी करा. 


कलश मांडा, आता रोळी, चंदन, अक्षत, खीर, पंचामृत, गूळ हरभरा, गुलाबाची फुलं आणि गुलाल अर्पण करा. 


पूजा झाल्यावर आरती करा.


कलशातील पाणी घरातील प्रत्येक कोपऱ्यात शिंपडा. तिजोरी किंवा पैसे ठेवलेल्या ठिकाणीही शिंपडा. 


(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)