मुंबई : दिवाळी जवळ आली की, बाजारापेठांमध्ये आकाशकंदील आणि पणत्यांसोबतच आणखी एक गोष्ट अधिक बघायला मिळते. दिवाळी सण जसा दिव्यांचा तसाच तो रांगोळ्यांचा सुद्धा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिवाळीत प्रत्येक घरांसमोर सुंदर रंगीबेरंगी रांगोळ्या बघायला मिळतात. बहुतेकांना चांगल्या रांगोळ्या येतात. पण काहींना नवनवीन डिझाईन काढता येत नाहीत. अशांसाठी आम्ही एक व्हिडिओ घेऊन आलो आहोत. 



दिवाळीत बाजारात रंगीबेरंगी रांगोळ्यांसोबतच वेगवेगळ्या डिझाईनचे नक्षीदार छापेही मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी असतात. ज्यांना वेगळ्या नवीन डिझाईन हव्या असतात ते लोक हे विकत घेतात. पण या छाप्यांविनाही तुम्ही चांगली रांगोळी काढू शकता. या व्हिडिओत सोप्या पद्धतीने चांगल्या डिझाईनच्या रांगोळ्या काढण्याच्या टीप्स देण्यात आल्या आहेत. पूनम बोरकर यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर हा व्हिडिओ टाकला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना सोप्या पद्धतीने रांगोळ्या काढणे शिकता येईल.