148 वर्षांनी तयार होणार मंगळ-शनीचा दुर्मिळ योग; `या` राशीच्या लोकांची वाढू शकते संपत्ती
Shani, Shukra And Mangal Yuti In Kumbh: अशा परिस्थितीत कुंभ राशीत शुक्र, शनि आणि मंगळाचा संयोग होणार आहे. हे योग तब्बल 148 वर्षांनंतर तयार होणार आहे. ज्याचा सर्व राशींवर परिणाम होईल. काही राशींना कर्जापासून मुक्ती मिळणार आहे.
Shani, Shukra And Mangal Yuti In Kumbh: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ग्रहांच्या गोचरमुळे राशीमध्ये ग्रहांची युती होते. मंगळ, ग्रहांचा सेनापती, कुंभ राशीत प्रवेश केला आहे. मुख्य म्हणजे या ठिकाणी शुक्र आणि शनी आधीच उपस्थित आहेत.
अशा परिस्थितीत कुंभ राशीत शुक्र, शनि आणि मंगळाचा संयोग होणार आहे. हे योग तब्बल 148 वर्षांनंतर तयार होणार आहे. ज्याचा सर्व राशींवर परिणाम होईल. काही राशींना कर्जापासून मुक्ती मिळणार आहे. या योगामुळे काही राशींच्या आयुष्यात चांगले दिवस येणार आहेत. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
धनु रास (Dhanu Zodiac)
शनि, मंगळ आणि शुक्र यांचा संयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. यावेळी तुमचे धैर्य आणि शौर्य वाढेल. तुम्हाला अनपेक्षित पैसे देखील मिळू शकतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही लाभ मिळण्याची शक्यता आहे. परदेश प्रवासाचीही शक्यता आहे. कामानिमित्त प्रवास करण्याची संधी मिळेल. याशिवाय घरामध्ये शुभ कार्य होण्याची शक्यता आहे.
कन्या रास (Kanya Zodiac)
शनि, मंगळ आणि शुक्र यांची जोडी तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकते. तुम्हाला कर्जमुक्ती मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी मान-सन्मान मिळू शकतो. लव्ह लाईफच्या बाबतीत तुम्हाला फायदा होऊ शकतो. व्यवसायातही मोठा नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या समस्या आता संपुष्टात येऊ शकतात.
मेष रास (Aries Zodiac)
शनि, मंगळ आणि शुक्राचा योग तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या शुभ सिद्ध होऊ शकतो. यावेळी तुमची प्रगती होईल. वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमचे काम व्यवसाय, परदेशी, इलेक्ट्रॉनिक उद्योग असेल तर तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. एखाद्याला पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा लाभ मिळू शकतो. व्यवसायात निर्माण होणारी कोणतीही समस्या आपोआप सुटणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)