Full Moon Virgo: हिंदू पंचागानुसार, एका वर्षात एकूण 12 पौर्णिमा असतात. पौर्णिमा हा महिन्यातील एकमेव दिवस आहे जेव्हा चंद्र 16 चरणांनी भरलेला असतो. अशा स्थितीत, चंद्राचा प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे सकारात्मक प्रभाव पडतो. यामध्येच माघ महिन्याची पौर्णिमा खूप खास मानली जाते. माघ पौर्णिमा 24 फेब्रुवारीला आहे आणि ती कन्या राशीत असणार आहे. कन्या राशीतील माघ पौर्णिमेची घटना ही एक अद्भुत घटना आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्योतिष शास्त्रानुसार, ज्यावेळी पौर्णिमा कन्या राशीत असते तेव्हा विविध लाभ होतात. कन्या राशीचा स्वामी बुध आहे. त्यामुळे प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावरही बुध ग्रहाचा प्रभाव राहणार आहे. पौर्णिमा कन्या राशीमध्ये असते तेव्हा सूर्य मीन राशीमध्ये 23 अंशांवर विरुद्ध दिशेला असतो. जाणून घेऊया यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ मिळू शकतो.


24 फेब्रुवारीला येणारी माघ पौर्णिमा खूप खास मानली जाते. पंचांगानुसार, या महिन्याची पौर्णिमा 'स्नो मून' म्हणून ओळखली जाते कारण ही वर्षाची वेळ असते जेव्हा उत्तर गोलार्धात सर्वात जास्त हिमवर्षाव होतो. याशिवाय या महिन्याच्या पौर्णिमेला “मायक्रोमून” असेही म्हणतात. याचं कारण म्हणजे ही वर्षातील सर्वात लहान पौर्णिमा आहे.


वृषभ रास (Taurus Zodiac)


वृषभ राशीसाठी या पौर्णिमेचा चांगला परिणाम होणार आहे. मन आणि विचारामुळे तुम्ही कोणतेही मोठे स्वप्न साकार करू शकता. प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. नात्यातील दुरावा संपुष्टात येणार आहे. बेरोजगार आहेत त्यांना नोकरीची संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांवरही माता लक्ष्मीची विशेष कृपा असेल. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळू शकणार आहे. चंद्राच्या प्रभावामुळे तुम्ही एखाद्या खास व्यक्तीकडे आकर्षित होऊ शकता.


मकर रास (Capricorn Zodiac)


या राशीच्या लोकांसाठी पौर्णिमा देखील खूप फायदेशीर ठरू शकते. अविवाहित लोकांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. अपूर्ण राहिलेलं कोणतंही काम आता पूर्ण करता येणार आहे. परदेशात नोकरीची संधी मिळू शकणार आहे. व्यावहारिक कल्पना खूप चांगल्या असतील. या काळात तुम्हाला शिक्षणाशी संबंधित कामात फायदा होईल. तुम्ही कमी कष्टात जास्त यश मिळवू शकता.  या काळात तुम्ही तुमचे काही नवीन काम सुरू करू शकता. 


कर्क रास (Cancer Zodiac)


या राशीचा स्वामी स्वतः चंद्र आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना कन्या पौर्णिमेचे विशेष लाभ मिळू शकतात. तुमच्या जीवनाचा खरा उद्देश सापडेल आणि त्यात यश मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. नोकरदार लोकांना नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. तुम्ही तुमच्या मेहनतीच्या जोरावर प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकाल. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)