मुंबई : आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल याची माहिती घेऊया. जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य.


मेष (Aries)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजच्या दिवशी अनावश्यक प्रवास टाळावा. याशिवाय संध्याकाळपासून परिस्थिती सुधारेल. 


वृषभ (Taurus)


तुम्ही दिवसभर ताजेतवाने रहाल. नोकरीत तुम्हाला यश मिळेल आणि व्यवसायातही फायदा होईल. कौटुंबिक वाद संपेल. आजच्या दिवशी तुमचं प्रत्येक कार्य अगदी सहजपणे पूर्ण कराल. विद्यार्थ्यांना परीक्षा-स्पर्धेत यश मिळेल.


मिथुन (Gemini)


मन प्रसन्न होईल. कुटुंबासमवेत चांगला वेळ घालवेल. तुम्हाला प्रवासाचा आनंद मिळेल. व्यवसायात चांगला फायदा होईल. दिवस चांगला सुरू होईल. तुमच्यात नवीन उत्साह पहायला मिळेल. 


कर्क (Cancer)


तुमचा दिवस फार चांगला जाणार नाही. तुम्हाला संघर्षपूर्ण परिस्थितीचा सामना करावा लागेल. अशा वेळी, तुम्हाला नक्कीच कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. त्यामुळे धैर्य गमावू नका आणि आगामी कठीण परिस्थितीला सामोरे जा. 


सिंह (Leo)


तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. ते काम असो किंवा कौटुंबिक आनंद, आपल्यासाठी वेळ खूप शुभ आहे. तुमचं लक्ष चांगल्या कामाकडे जाईल. तुम्हाला मानसिक शांती मिळेल. 


कन्या (Virgo)


शुक्रवार आपल्यासाठी अविस्मरणीय दिवस असेल. दिवसाची चांगली सुरूवात होणार आहे. मित्र किंवा कुटुंबियांसह तुमचा चांगला प्रवास होईल, एकमेकांसोबत चांगला वेळ घालवाल.


तुला (Libra)


नशीब तुमच्या सोबत आहे. तुमच्या कामातील कामगिरी चांगली असणार आहे. आपल्याकडे जी बोलण्याची कला आहे ती तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यास उपयुक्त ठरतं. 


वृश्चिक (Scorpio)


तुम्हाला कामात यश मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या कल्पना मनात येऊ शकतात. या कल्पनांना वास्तविक आकार देऊ शकता. भाग्य तुमच्या सोबत असेल. आपण आपल्या मित्रांसह आणि परिचितांसोबत चांगला वेळ घालवाल.


धनु (Sagittarius)


आवश्यक काम संध्याकाळपर्यंत पूर्ण करा. तुमच्या मनात नकारात्मक विचार येऊ देऊ नका. 


मकर (Capricorn)


आजच्या दिवशी मानसिक समस्या वाढू शकतात. याशिवाय माता दुर्गेची पूजा करा.


कुंभ (Aquarius)


या राशीच्या व्यक्तींना नोकरीत प्रगतीचे योग आहेत. सकाळी योग आणि ध्यान करा. 


मीन (Pisces)


मीडियाशी संबंधित लोकांना फायदा होईल. विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळतील.