मुंबई : आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल याची माहिती घेऊया. जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य.


मेष


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजच्या दिवशी नवीन घर खरेदी करण्याचा योग आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.


वृषभ


परदेशात प्रवासाची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्याचप्रमाणे नोकरीत यश मिळेल. मात्र आजच्या दिवशी रागावर नियंत्रण ठेवा.


मिथुन


आजच्या दिवशी मनातील चिंता संपणार आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं. दैनंदिन जीवनातील खर्च आधीपेक्षा वाढेल.


कर्क 


घरातील भांडण संपुष्टात येण्याची शक्यता आहे. कुटुंबातील व्यक्तींचा सल्ला नक्की घ्या. पत्नीचा आदर करा.


सिंह


आजच्या दिवशी या राशीच्या व्यक्तींना उधार दिलेले पैसे परत मिळणार आहेत. व्यावसायिक समस्या कमी होतील. जोडीदाराची तब्येत बिघडेल.


कन्या


आजच्या दिवशी मोठ्यांचा आशिर्वाद घ्या. तसंत गाडी खरेदीचा योग आहे. नात्यात गोडवा येईल.


तूळ 


आजच्या दिवशी व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. नवीन कामामध्ये फायदा होईल.


वृश्चिक


आजच्या दिवशी व्यवसायात केलेल्या गुंतवणुकीतून फायदा होणार आहे. नात्यामध्ये सावधगिरी बाळगा. कोणाशीही भांडण करू नका.


धनु


तुमच्या घरातील मोठ्या व्यक्तींचे आशीर्वाद मिळणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. घराच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या.


मकर


सध्याच्या काळात नोकरीत कोणताही बदल करू नका. आज गाडी जपून चालवा. उधार दिलेले पैसे परत मिळणार आहेत.


कुंभ


संध्याकाळपर्यंत चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टी सांभाळून ठेवा. मित्रांचे सहकार्य लाभेल.


मीन


तुमचं कोणतंही काम असेल ते दुपारपर्यंत करा. अचानक होणारी इजा टळेल. तुमच्या जोडीदाराचा आदर करा.