Horoscope 8 october : या राशीच्या व्यक्तींनी आज घाईगडबडीत निर्णय घेऊ नका!
जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य
मुंबई : आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल याची माहिती घेऊया. जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य.
मेष
आजच्या दिवशी तुमच्या रागावर तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल. व्यापारात बदल करण्याची योग आहेत. अनपेक्षित लाभ होणार आहे.
वृषभ
आजच्या दिवशी कोणतेही निर्णय विचारपूर्वक घ्या, घाईगडबडीत निर्णय घेऊ नका. नवी नोकरी शोधू शकता. व्यापारात सावधगिरीने पाऊल टाका.
मिथुन
नवं वाहन खरेदीचा योग आहे. शक्यतो व्यापारात कोणावर विश्वास ठेवू नका. जोडीदाराची योग्य साथ लाभेल.
कर्क
आजच्या दिवशी प्रवास करणं टाळा. तसंच घरात कोणाशीही वाद घालू नका. संध्याकाळनंतरची वेळ फार उत्तम आहे.
सिंह
आजच्या दिवशी तुमच्या वैवाहिक जीवनात सुधारणा होण्याची शक्यता आहे. फिरायला जाण्याचे योग आहेत. नोकरीत बढती मिळू शकते.
कन्या
कुटुंबातील सदस्यांचं सहकार्य मिळेल. नोकरीतील अडचणी दूर होतील. व्यापारात लाभ होईल.
तूळ
आजच्या दिवशी तुमच्या आरोग्यामध्ये सुधारणा जाणवणार आहे. कर्जातून सुटका होईल. शिवाय जुन्या मित्रांची भेट होऊ शकते.
वृश्चिक
आजचा दिवस चांगला आहे कारण तगड्या पगाराची नोकरी मिळण्याचे योग आहेत. आपल्या वाणीवर मात्र आज नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.
धनू
आजच्या दिवशी प्रिय व्यक्तींची भेट होणार आहे. त्याचप्रमाणे समाजात प्रतिष्ठा मिळेल. दिवसाच्या सुरुवातीलाच आनंदाची बातमी मिळणार आहे.
मकर
आजच्या दिवशी नोकरी बदलल्याने मोठा लाभ होणार आहे. त्याचप्रमाणे विवाहाचे योग आहेत. सयंम राखावा लागू शकतो.
कुंभ
जुन्या खटल्याचा निकाल तुमच्या बाजुने येईल. वैवाहिक जीवनात आणखी गोडवा येईल. याशिवाय नोकरीत प्रगतीचे योग आहेत.
मीन
आजच्या दिवशी तुम्ही नवी गाडी खरेदीची घाई करू नका. डोळ्यांची समस्या दूर होईल.