Ratha Saptami Puja Vidhi :  माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी रथ सप्तमी साजरी केली जाते. याला माघ सप्तमी असेही म्हणतात. हिंदू धर्मात रथ सप्तमीला खूप महत्व आहे. सप्तमीच्या दिवशी सूर्यदेवताची पूजा केली जाते. यंदा रथ सप्तमी शनिवारी 28 जानेवारी रोजी साजरी होणार आहे. रथ सप्तमीचे व्रत करून सूर्याची विधिवत पूजा केल्याने मनुष्य पापमुक्ती मिळते अशी श्रद्धा आहे. रथ सप्तमीच्या दिवशी काही धार्मिक उपाय केल्यास आयुष्यात भरभराट होते. करियरमध्ये देखील मोठे यश मिळेल. 


सूर्याची उपासना करा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अरुणोदयाच्या मुहूर्तावर या दिवशी पवित्र स्नानाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे रथ सप्तमीच्या दिवशी स्नानाची वेळ पहाटे 04:24 ते 05:51 पर्यंत ब्रह्म मुहूर्तापर्यंत असेल.  हिंदू धर्मातील पौराणिक मान्यतेनुसार रथ सप्तमीला सूर्यदेवाची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर  होतात. ज्योतिषशास्त्रात सूर्याला रोगप्रतिकारक शक्तीचा कारक मानला जातो. अशा स्थितीत पवित्र नदीत स्नान करून या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्यास आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतात. या दिवशी सूर्याची उपासना केल्यास आरोग्याचे वरदान मिळू शकते. 


रथ सप्तमीच्या दिवशी या चुका करू नका 


रथ सप्तमीच्या दिवशी काही खास चुका करणे टाळा. याचा तुम्हाला निश्चित फायदा होईल.  या दिवशी स्वतःला क्रूरतेपासून दूर ठेवा आणि घरात शांतता राखा. दारूचे सेवन अजिबात करू नका. रथ सप्तमीला मिठाचे सेवन निषिद्ध मानले जाते. लसूण आणि कांदा यांसारखे पदार्थ टाळा. घरातील वातावरण प्रसन्न ठेवा. ब्रह्मचर्य पाळा.


रथ सप्तमीच्या दिवशी हे उपाय नक्की करा


  • रथ सप्तमीचे व्रत नक्की करा. या दिवशी मीठाचे सेवन करू नका. मात्र, मीठाचे दान आवश्य करा. असे केल्याने सूर्यदेवाच्या कृपेने शारीरिक वेदना दूर होतात. 

  • वैवाहिक जीवनात आनंद मिळवण्यासाठी रथ सप्तमी किंवा अचला सप्तमीला सकाळी लवकर स्नान करावे, स्वच्छ वस्त्र परिधान करावे आणि पवित्र नदी किंवा जलाशयात तिळाच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करावा. 

  • करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी रथ सप्तमीच्या दिवशी उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यावे. यासाठी तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात लाल चंदन, गूळ आणि लाल फुले टाकून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. तसेच आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे. करिअरमध्ये झपाट्याने प्रगती होईल. आत्मविश्वास वाढेल. यासोबतच मानसन्मानातही वाढ होईल. यामुळे तुमची आर्थिक भरभराट होईल.

  • आत्मविश्वास आणि सुख-समृद्धी मिळविण्यासाठी रथ सप्तमीच्या दिवशी स्नानाच्या पाण्यात लाल चंदन, गंगाजल आणि केशर टाकून स्नान करावे. याचा खूप फायदा होईल. 

  • रथ सप्तमी किंवा अचला सप्तमीला स्नान आणि पूजा केल्यानंतर मसूर, गूळ, तांबे, गहू, लाल किंवा केशरी वस्त्र गरीब ब्राह्मणाला दान करा. यामुळे कुंडलीत सूर्य बलवान होतो आणि शुभ फल प्राप्त होतो.