Shani Vakri 2022 Effect : प्रत्येक राशिला साडेसातीला सामोरे जावं लागतं. साडेसाती सुरु असताना अनेक समस्याही उदभोवात. 29 एप्रिलनंतर शनीच्या राशीमध्ये बदल झाले होते. तर ज्योतिषीय शास्त्रानुसार पुन्हा एकदा शनी राशीत बदल करणार आहे. त्यामुळे बदल होताना कोणत्या राशींवर याचा परिणाम होणार आहे? जाणून घ्या  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्योतिषींनी दिलेल्या माहितीनुसार शनी 5 जूनला वक्री होणार. त्यानंतर 12 जुलैला पुन्हा वक्री मार्गाने शनी कुंभ राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करेल. 17 जानेवारी 2023पर्यंत शनी मकर राशीत राहणार आहे. त्यामुळे 6 महिन्यात अनेक राशींच्या जीवनात याचा प्रभाव पडताना दिसणार आहे. त्याचबरोबर ज्या राशी शनीच्या प्रभावापासून मुक्त झाले होते, ते पुन्हा एकदा शनीचा प्रभाव जाणू लागेल. त्याचदरम्यान ज्यांच्यावर शनीचा प्रभाव सुरु झाला होता, त्या राशींना काहीकाळ प्रभाव जाणवणार नाही. 


'या' राशींवर शनीच्या साडे सातीचा प्रभाव - 


29 एप्रिल रोजी शनी ही कुंभ राशीत प्रवेश केल्याने धनु राशींना साडे सातीपासून मुक्ती मिळेल. मात्र 12 जुलै रोजी शनी पुन्हा एकदा मकर राशीत प्रवेश करेल आणि धनु राशीवर पुन्हा शनीचा प्रभाव दिसेल. 17 जानेवारी 2023पर्यंत धनु राशीच्या लोकांसाठी हा वेळ खूप कष्टाचा ठरेल. त्यामुळे धनु राशीच्या लोकांनी सावधान रहावे. मात्र 17 जानेवारीनंतर या राशींना शनीच्या प्रभावापासून पूर्णता मुक्ती मिळेल.