Samsaptak yog : समसप्तक योगाने वाढवणार डोकेदुखी; `या` राशींच्या व्यक्तींचं होणार मोठं नुकसान
Samsaptak yog 2023: समसप्तक राजयोग हा वैदिक ज्योतिषशास्त्रातील दुर्मिळ योगांपैकी एक मानला जातो. हा योग अत्यंत नकारात्मक प्रभाव देखील निर्माण करू शकतो. या योगावेळी काही राशीच्या लोकांनी सावध राहण्याची गरज आहे.
Samsaptak yog 2023: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रहांच्या गोचरनंतर खास राजयोग तयार होतात. यामध्ये समसप्तक राजयोग हा वैदिक ज्योतिषशास्त्रातील दुर्मिळ योगांपैकी एक मानला जातो. दोन ग्रहांनी तयार केलेला समसप्तक योग देखील वादविवाद, मतभिन्नता आणि लोकांमध्ये संघर्ष निर्माण करू शकतो. या योगाचे सकारात्मक तसंच नकारात्मक परिणाम दिसून येतात. हा योग अत्यंत नकारात्मक प्रभाव देखील निर्माण करू शकतो. या योगावेळी काही राशीच्या लोकांनी सावध राहण्याची गरज आहे.
वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्य आणि शनी हे दोन्ही अतिशय शक्तिशाली ग्रह मानले जातात. सूर्याला शनीचा पिता मानलं गेलंय. सूर्याच्या विचारांनी शनी नेहमी असंतुष्ट असतो. शनी हा कर्माचा न्याय करणारा आहे आणि नेहमी कर्मानुसार फळ देतो. समसप्तक योगामध्ये सूर्य आणि शनी विरुद्ध स्थितीत असतात. यावेळी काही राशींवर नकारात्मक परिमाम दिसतो. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींनी यावेळी सावध राहिलं पाहिजे.
कर्क रास ( Cancer Zodiac Sign )
समसप्तक योग तयार झाल्यामुळे या राशीच्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. या काळात थोडासा मानसिक तणाव राहणार आहे. यावेळी कामाचा ताण तुम्हाला जाणवणार आहे. मुलाच्या बाजूने कोणतीही चिंता त्रासदायक ठरू शकते. तुमच्या बोलण्याने कोणाचे तरी मन दुखावेल. प्रेम जीवनातही चढ-उतार असतील.
कन्या रास ( Virgo Zodiac Sign )
कन्या राशीच्या लोकांसाठी समसप्तक योग संमिश्र परिणाम देणारा असणार आहे. या राशीच्या लोकांना आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. जास्त खर्च झाल्याने नुकसान होण्याचीही शक्यता आहे. या काळात तुमचं मन कशातच गुंतून राहणार नाही. तुमच्या आरोग्याची थोडी काळजी घेण्याची गरज आहे.
मकर रास ( Capricorn Zodiac Sign )
या राशीमध्ये शनी सतीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. यावेळी समसप्तक योग तयार झाल्यामुळे या राशीच्या लोकांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मानसिक तणावाचा सामना करावा लागतो. तब्येत चांगली राहण्याची शक्यता खूपच कमी आहे. जीवनशैली आणि खाण्यापिण्याकडे अधिक लक्ष द्या. तुम्हाला अनावश्यक खर्चाचा त्रास होऊ शकतो. आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. कौटुंबिक बाजूने काही समस्या उद्भवू शकतात.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )