ज्या प्रकारे ज्योतिषी, हस्तरेषा, अंकशास्त्र याद्वारे व्यक्तीच्या भविष्याविषयी अनेक गोष्टी जाणून घेता येतात. त्याचप्रमाणे, समुद्रशास्त्रात मानवी शरीराची रचना, तीळ, चिन्हे यावरून बरेच अंदाज लावता येतात. सामुद्रिक शास्त्रात पायाच्या बोटांबद्दलही बरीच माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या लोकांच्या अंगठ्याच्या शेजारचं बोट हे मोठं असेल तर असे लोक खूप भाग्यवान मानले जातात.  त्यांना वैवाहिक जीवनात खूप आनंद मिळतो. बायको खूप मदत करते. अशा लोकांचा विवाह एखाद्या व्यावसायिक व्यक्तीशी किंवा नोकरी करणाऱ्या व्यक्तीशी होतो.



ज्यांच्या सर्व बोटांमध्ये अंतर असते, अशा लोकांना नेहमी पैशांची चणचण भासते. त्यांना नेहमीच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.



ज्या व्यक्तीच्या पायाची बोटे उजवीकडे झुकलेली असतात. यासोबतच जर ते मऊ आणि एकमेकांमध्ये मिसळलेले असतील तर असे लोक खूप भाग्यवान मानले जातात. त्यांना सर्व प्रकारचा आनंद मिळतो, त्यांना जीवनात जे काही करायचं त्यामध्ये ते यशस्वी होतात.



ज्या लोकांचे मधले बोट प्रदशिनीपेक्षा मोठे असते अशा व्यक्ती विद्वान असतात. हे लोक आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर पैसा कमावतात. हे लोक आपल्या बौद्धिक क्षमतेच्या जोरावर अनेक स्थाने मिळवतात.



पायाच्या अंगठ्याच्या बाजूचं बोट अंगठ्यापेक्षा लहान असेल तर अशा व्यक्तींना स्त्री सुख क्वचितच मिळते. त्यांचे वैवाहिक जीवन सुखी नाही आणि प्रत्येक कामात पत्नीची साथ मिळत नाही.



(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. Z24 तास याची पुष्ठी करत नाही.)