Samudrik Shastra: ज्योतिषशास्त्राप्रमाणे सामुद्रिकशास्त्रानुसारही भाकीत वर्तवलं जातं. सामुद्रिकशास्त्रात हातावरील रेषा, तीळ, उंचवटे, चिन्हं यावरून भविष्य वर्तवलं जातं. काही चिन्हं भाग्योदय दर्शवत असतात. हातावरील काही भाग हे नवग्रहांशी निगडीत असतात. प्रत्येक छोट्यातील छोटी रेष हे आपलं नशिब सांगत असते. शरीरावरील शुभ चिन्ह आर्थिक स्थिती, उच्च पद, संपत्ती याबाबत संकेत देतात.  अशी काही शुभ चिन्ह आहेत ज्यामुळे आर्थिक उन्नती होते, चला तर याबाबत जाणून घेऊयात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चक्र- सामुद्रिकशास्त्रानुसार ज्या लोकांच्या हात किंवा पायावर चक्र असतं. ते खूप भाग्यशाली मानले जातात. अशी लोकं जीवनात उच्च पदावर काम करतात. अशी लोकं राजासारखं आयुष्य जगतात. तसेच समाजात मानसन्मान मिळतो. अशा लोकांना आयुष्यात पैशांची उणीव भासत नाही. 


ध्वज- ज्या लोकांच्या हात किंवा पायावर ध्वज चिन्हं असतं, असे लोक नशिबवान असतात. आयुष्य आरामात जगतात आणि कोणतीही अडचण येत नाही. सत्तेत मोठं मिळण्याची शक्यता असते. त्याचबरोबर दुसऱ्यांना मदत करण्यास मागे पुढे पाहात नाहीत. 


तीळ- सामुद्रिकशास्त्रात तीळ हे महत्त्वाचं चिन्ह आहे. तीळ कोणत्या ठिकाणी आहे, यावरून भाकीत वर्तवलं जातं. कपाळाच्या मधोमध तीळ असणं शुभ मानलं जातं. गरीब घरात जन्म घेऊनही सर्वकाही आपल्या बळावर मिळवतात. त्याचबरोबर आयुष्यात चांगला जोडीदारदेखील मिळतो. 


Sun Transit 2022: तीन दिवसानंतर सूर्य करणार राशीबदल, या राशींचं नशिब चमकणार


शंख आणि कमळ- हे दोन्ही चिन्ह हिंदू धर्मात मानाचे आहेत. शंख भगवान विष्णुंचं तर देवी लक्ष्मी कमळावर स्थित आहे. त्यामुळे हे दोन्ही चिन्ह प्रभावी ठरतात. असे चिन्हं असलेले लोक अध्यात्म्याशी जवळीक साधतात. तसेच नशिबात अपार धन संपत्ती असते.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)