Sankashti Chaturthi : आज संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi) आहे, आज गणपती बाप्पाची पूजा करून त्याचे आशीर्वाद घेण्यासाठी आपल्याकडे उपवास केले जातात. गणेशाची आराधना केली जाते.आजच्या दिवशी जर तुम्ही बाप्पाची मूर्ती घरी आणण्याचा विचार करणार असाल तर काही खास गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत. 
सनातन धर्मात सर्वप्रथम गणपतीची पूजा करण्याचा नियम आहे. कोणत्याही पूजेची सुरुवात गणपतीच्या पूजेने होते. असे म्हणतात की जो कोणी श्रीगणेशाची भक्तिभावाने पूजा करतो त्याचे सर्व संकट दूर होतात. यासोबतच घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. मात्र, गणपतीच्या पूजेच्या वेळी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. पूजेत काही चूक झाली असेल तर ती व्यक्तीसाठी अशुभ असते. याशिवाय गणपतीची मूर्ती खरेदी आणि प्रतिष्ठापना करतानाही विशेष खबरदारी घ्यावी. (sankahti chaturthi vastu tips for keeping ganesha idol where to keep it for benefts )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- घरामध्ये गणपतीची मूर्ती तेव्हाच स्थापित करा जेव्हा तुम्ही दररोज त्यांची पूजा आणि प्रार्थना करू शकता. जर तुम्हाला जमत नसेल तर घरात मूर्तीची प्रतिष्ठापना करू नका.


- गणपतीची मूर्ती 18 सेमी पेक्षा जास्त उंच नसल्याची खात्री करा. या आकाराच्या मूर्तीची घरी पूजा करावी, अशी धार्मिक मान्यता आहे.


- उजव्या बाजूला सोंड असलेली मूर्ती खरेदी करू नका, कारण गणपतीच्या या स्वरूपाच्या पूजेचा विशेष नियम म्हणजे निष्ठा.


- घरामध्ये मूर्तीची स्थापना करताना त्यांचे तोंड मुख्य दरवाजाकडे असेल याची खात्री करा.


- बेडरूममध्ये गणेशाची मूर्ती बसवू नका.(Sankashti Chaturthi)


- काही लोक शिडीखाली देवघर बांधतात. असे अजिबात करू नका तसेच या ठिकाणी गणपतीची मूर्ती बसवू नका.


- गणपतीच्या उजव्या बाजूला लक्ष्मीची मूर्ती ठेवा. माँ लक्ष्मी ही आदिशक्ती आहे जी गणपतीची आई आहे. त्यामुळे गणपतीच्या डाव्या बाजूला लक्ष्मीची मूर्ती ठेवायला विसरू नका. (Sankashti Chaturthi) (sankahti chaturthi vastu tips for keeping ganesha idol where to keep it for benefts )