Sankashti Chaturthi 2024 : बुधवारी माघ संकष्ट चतुर्थी! शुभ मुहूर्त आणि तुमच्या शहरात चंद्रोदयाची वेळ जाणून घ्या
Dwijapriya Sankashti Chaturthi 2024 : कुठलही शुभ कार्य सुरु करण्यापूर्वी आपण श्रीगणेशाची आराधना करतो. अशी मान्यता आहे बाप्पाची मनोभावे पूजा केल्यास तो आपल्यावरील सर्व संकट दूर करतो. बाप्पाची आराधना करण्यासाठी संकष्ट चतुर्थी अतिशय खास असते.
Sankashti Chaturthi 2024 : हिंदू धर्मात सर्व देवदेवतांची पूजा आणि उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. कुठलीही पूजा असो किंवा शुभ कार्य सर्वप्रथम गणेशाची आराधना करण्यात येते. बाप्पा हा विघ्नहर्ता असून तो सर्व संकट दूर करतो. अशात प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचे व्रत केलं जातं. माघ महिन्यातील संकष्ट चतुर्थी ही बुधवारी 28 फेब्रुवारीला करण्यात येणार आहे. माघ महिन्यातील संकष्ट चतुर्थीला द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी असं म्हणतात. (Sankanshti Chaturthi 2024 Date Chandroday Time Ganesh Puja Shubh Muhurat and Importance Dwijapriya Sankanshti Chaturthi in Marathi)
द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी शुभ मुहूर्त
संकष्टी चतुर्थी बुधवार, 28 फेब्रुवारी 2024 ला पहाटे 1:53 वाजेपासून 29 फेब्रुवारीला पहाटे 4:18 वाजता वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार संकष्टी चतुर्थी 28 फेब्रुवारी 2024 ला साजरी करण्यात येणार आहे.
संकष्टी चतुर्थीला 'हे' उपाय करा
अडथळे दूर करण्यासाठी
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीसमोर दोन सुपारी आणि दोन वेलची ठेवून त्याची पूजा करा. यामुळे गणेश प्रसन्न होऊन भक्तांच्या मार्गात येणारे अडथळे दूर अशी मान्यता आहे.
संपत्ती वाढवण्यासाठी
जर तुम्हाला तुमची आर्थिक स्थिती मजबूत करायची असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी लाल रंगाचे कापड घेऊन त्यात श्री यंत्र आणि सुपारी घ्या. यानंतर गणेशाची पूजा करा. पूजा केल्यानंतर या वस्तू तिजोरीत किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे लाल कपड्यातच बांधून ठेवा.
चंद्र देवाला जल अर्पण करा
द्विजप्रिया संकष्टी चतुर्थीच्या संध्याकाळी चंद्रोदयानंतर चंद्र देवाला विधीपूर्वक अर्घ्य अर्पण करु व्रत सोडलं जातं. या दिवशी संध्याकाळी शुद्ध पाणी आणि त्यासोबत लाल चंदन, कुश, फुलं, अक्षत इत्यादी टाकून चंद्राला अर्पण द्या.
या मंत्राचा जप करा
ज्योतिषशास्त्रानुसार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विद्यार्थ्यांनी ओम गं गणपतये नमः या मंत्राचा जप केल्याने तुम्हाला कुशाग्र बुद्धिमत्ता, शिक्षण आणि ज्ञान प्राप्त होते अशी मान्यता आहे.
संकष्टी चतुर्थी 2024 चंद्रोदय वेळ
पंचांगानुसार संकष्टी चतुर्थीला 28 फेब्रुवारीला रात्री 9.24 वाजता चंद्रोदय होणार आहे. अशा स्थिती तुमच्या शहरात चंद्रोदया वेळ काही जाणून घ्या.
तुमच्या शहरात चंद्रोदय कधी?
मुंबई - 09.49
बीड - 09.37
ठाणे - 09.48
सांगली - 09.40
पुणे - 09. 44
सावंतवाडी - 09.42
रत्नागिरी - 09.45
सोलापूर - 09.35
कोल्हापूर - 09.41
नागपूर - 09.24
सातारा - 09.43
अमरावती - 09.30
नाशिक - 09.46
अकोला - 09.33
अहमदनगर -09.41
औरंगाबाद - 09.39
पणजी - 09.42
भुसावळ- 09.38
धुळे - 09.42
परभणी - 09.33
जळगाव - 09.39
नांदेड-09.30
वर्धा - 09.26
उस्मानाबाद - 09.35
यवतमाळ- 09.28
भंडारा - 09.22
चंद्रपूर - 09.23
बुलढाणा - 09.36
इंदौर- 09.39
ग्वाल्हेर - 09.33
बेळगाव - 09.39
मालवण- 09.44
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)