Saphala Ekadashi 2022: हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिना सर्वात पवित्र महिना म्हणून मानला जातो. या महिन्यात अनेक महत्त्वपूर्ण सण आणि व्रत येतात. मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला सफला एकदशी (Safala Ekadashi) म्हटलं जातं. 19 डिसेंबर 2022 या वर्षातील शेवटची एकादशी आहे. या दिवशी भगवान विष्णुची मोठ्या भक्तिभावाने आणि विधीपूर्वक पूजा केल्याने यश मिळतं. या दिवशी व्यक्तींची खास नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. व्रत न करताही काही गोष्टींचं पालन केल्यास अपेक्षित फळ मिळतं. चला जाणून घेऊयात सफला एकादशीचं तिथी आणि मुहूर्त कधी आहे.


सफला एकादशी 2022 मुहूर्त


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी 19 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 3 वाजून 32 मिनिटांनी सुरु होईल. तसेच 20 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 2 वाजून 32 समाप्त होणार आहे. या दिवशी भगवान विष्णुंची विधीपूर्वक पूजा केली आहे. सफला एकादशीचा व्रत पारण शुभ वेळ 20 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 8 वाजून 5 मिनिटं ते 9 वाजून 13 मिनिटांपर्यंत असेल. 


सफला एकादशीला या बाबींचं पालन करा


  • सफला एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून देवासमोर हात जोडून व्रत संकल्प घ्या. या दिवशी सूर्याला अर्घ्य अवश्य द्यावे.

  • शुभ मुहूर्तावर सफाला एकादशीचे व्रत करा. भगवान विष्णूला हळद, अक्षदा, हंगामी फळे, मिठाई, सुपारी इत्यादी अर्पण करा. सफाला एकादशी व्रताची कथा जरूर ऐका.

  • एकादशी व्रताच्या दिवशी ब्रह्मचर्य पाळा. दुपारी झोपू नका. तोंडातून वाईट शब्द काढू नका आणि मनात वाईट विचार आणू नका. 'ओम नमो भगवते वासुदेवाय' या मंत्राचा जप करत राहा.


बातमी वाचा- Chanakya Niti: स्त्री-पुरुषांनी या गोष्टी कायम लपवून ठेवल्या पाहीजेत, अन्यथा...!


  • एकादशीचे व्रत पाळले नसले तरी चुकूनही या दिवशी भाताचे सेवन करू नये. तसेच तामसिक अन्न खाऊ नका. एकादशीच्या दिवशी मांसाहार केल्यास पापाचा भागीदार होतो.

  • एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श करू नका. पाणी अर्पण करू नये किंवा तुळशीची पाने तोडू नयेत. एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श केल्याने भगवान विष्णू क्रोधित होतात.

  • व्रताच्या दिवशी दान करा. कोणत्याही जीवाला इजा करू नका. नखे आणि केस कापू नका.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)