Shani-guru Gochar: दर महिन्याला कोणता ना कोणता ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. आता थोड्याच दिवसांत नवीन वर्ष सुरू होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार नवीन वर्षात प्रत्येक ग्रहाची स्थिती बदलत असते. यावेळी नवीन वर्षात शनिदेव फक्त कुंभ राशीतच राहणार आहेत. तर मे महिन्यात गुरु ग्रह वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. तर राहू मीन आणि केतू कन्या राशीत असून यामुळे अनेक राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंदच येणार आहे. 2024 हे वर्ष कोणत्या राशींसाठी भाग्यशाली असेल ते जाणून घेऊया…


मेष रास (Mesh Zodiac)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देवांचा गुरू मे महिन्यापर्यंत या राशीत राहणार आहे. यानंतर तो वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी या राशींच्या समाजात मान-सन्मान वाढणार आहे. संपत्ती वाढल्याने रखडलेली कामं पुन्हा सुरू होणार आहेत. व्यवसायातही मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामे पुन्हा सुरू होऊ शकतात. 


कर्क रास (Kark Zodiac)


नववर्षात या ग्रहांच्या स्थितीमुळे या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात झपाट्याने वाढ होणार आहे. या राशीच्या पाचव्या भावात शुक्र आणि बुधही असतील. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. शनीच्या कृपेने मेहनतीचे पूर्ण फळ मिळू शकणार आहे. तुम्हाला पदोन्नतीसह काही मोठी जबाबदारी मिळू शकते. 


वृश्चिक रास (Vraschik Zodiac)


वर्षाच्या सुरुवातीला सूर्य देवासोबत मंगळ तुमच्या दुसऱ्या घरात असेल. अशा परिस्थितीत आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. यासोबतच शुक्र आणि बुध देखील तुमच्या जीवनात आनंद आणू शकतात. करिअर क्षेत्राबद्दल बोलायचे झाले तर या वर्षी यश मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. 


कुंभ रास (Kumbh Zodiac)


या राशीमध्ये गुरू वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. यासोबतच शनिदेव वर्षभर तुमच्या राशीत राहणार आहे. या काळात तुमच्या व्यवसायात वाढ होणार आहे. नशिबाने साथ दिल्याने प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतं. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होणार आहेत. या काळात नवीन नोकरीच्या शोधात असलेले लोक यश मिळवू शकतात.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )