Shani-Budh Yuti: 30 वर्षांनी शनी-बुधाची होणार युती; `या` राशींचं नशीब चमकण्याची शक्यता
Conjunction Of Shani And Budh: बुध ग्रहाच्या गोचरमुळे 30 वर्षांनंतर कुंभ राशीमध्ये शनी आणि बुध यांचा संयोग निर्माण होणार आहे. या संयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे.
Conjunction Of Shani And Budh: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका निश्चित वेळी त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या एका राशीत दोन किंवा तीन ग्रहांचा संयोग तयार होतो. सध्या शनिदेव कुंभ राशीत भ्रमण करत आहेत. तर फेब्रुवारीच्या सुरुवातीला बुध ग्रह कुंभ राशीत प्रवेश करेल.
बुध ग्रहाच्या गोचरमुळे 30 वर्षांनंतर कुंभ राशीमध्ये शनी आणि बुध यांचा संयोग निर्माण होणार आहे. या संयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. परंतु यावेळी 3 राशी आहेत ज्यांच्या आयुष्यात चांगल्या दिवसांची भर पडणार आहे. जाणून घेऊया शनी आणि बुधाच्या संयोगाने कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ मिळणार आहे.
कुंभ रास (Kumbh Zodiac)
शनि आणि बुधाचं गोचर तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. कालावधीत तुम्हाला तुमच्या शिकण्याच्या क्षमतेत वाढ दिसून येणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्वात सुधारणा होणार आहे. नोकरीच्या ठिकाणी बदल अपेक्षित होणार आहे. आर्थिक योजना बनवण्यासाठी हा काळ खूप चांगला असणार आहे. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे तुम्हाला काम आणि व्यवसायात फायदा होईल. व्यवसायातही मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे.
मिथुन रास (Mithun Zodiac)
कर्म देणारा शनी आणि बुध यांची जोडी तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकणार आहे. या काळात तुमचं नशीब चमकू शकणार आहे. तुमचे करिअर खूप चांगले होणार आहे. कोणत्याही गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. तुम्ही काम-व्यवसायाशी संबंधित कारणांसाठी प्रवास करू शकता, जे शुभ सिद्ध होणार आहे. सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या लोकांनाही फायदा मिळू शकतो.
सिंह रास (Leo Zodiac)
सिंह राशीच्या लोकांसाठी बुध आणि शनीचे संयोजन अनुकूल ठरू शकणार आहे. जर तुम्ही विवाहित असाल तर तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात मोठे यश मिळू शकते. या कालावधीत तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये बरेच सकारात्मक परिणाम मिळतील. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला अनेक उत्तम संधी मिळतील. यावेळी तुमचे दैनंदिन उत्पन्न वाढेल.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)