Shani In Meen: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतो. यामध्ये शनी हा सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह मानला जातो. शनी हा नवग्रहातील सर्वात महत्त्वाचा ग्रह मानला जातो. शनी एका राशी सुमारे अडीच वर्षे राहतो. शनी सध्या त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीत विराजमान आहे. यामध्ये मार्च 2025 पर्यंत या राशीत राहणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्योतिष शास्त्रानुसार, सुमारे 30 वर्षांनी म्हणजेच 29 मार्च 2025 रोजी रात्री 11:01 वाजता शनी गुरूच्या मीन राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी तो 2 जून 2027 पर्यंत या राशीत राहणार आहे. शनीच्या या राशी बदलामुळे अनेकांना शनीच्या साडेसातीपासून आराम मिळण्याची शक्यता आहे. या काळात काही राशींच्या व्यक्तींना याचा फटका बसेल. यावेळी कोणत्या राशींनी सतर्क राहणं गरजेचं आहे हे पाहूयात.


मेष रास (Mesh Zodiac)


मीन राशीत शनीची वाटचाल या राशीसाठी अनुकूल ठरणार नाही. शनीच्या स्थिती बदलामुळे या राशीच्या लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. करिअर आणि बिझनेसमध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होणार नाही. कोणतीही गुंतवणूक किंवा व्यवसायात कोणताही बदल करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. छोट्या-छोट्या कामांसाठीही तुम्हाला जास्त मेहनत करावी लागू शकते. 


मिथुन रास (Mithun Zodiac)


शनीच्या स्थिती बदलामुळे या राशीच्या व्यक्तींना लाभ होणार नाही. या राशीच्या लोकांना अनेक प्रकारच्या निराशेचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबासोबत काही मुद्द्यावरून काही समस्या निर्माण होऊ शकतात. जोडीदारासोबत काही मुद्द्यावर मतभेद असू शकतात. या काळात धन हानी होण्याची अधिक शक्यता आहे. कुटुंबात अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. 


वृषभ रास (Vrishabha Zodiac)


या राशीच्या लोकांसाठी मीन राशीत शनीची चाल काही अडचणी वाढवू शकणार आहे. या काळात खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. नातेसंबंधांबाबत थोडी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. तुम्ही अनेकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अयशस्वी व्हाल. प्रत्येक कामासाठी तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल. जीवनात अनेक गुंतागुंत निर्माण होऊ शकतात. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )