Kendra trikon rajyog / Samsaptak Rajyog : ऑक्टोबर महिना हा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून अतिशय खास आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच बॅक टू बॅक तीन ग्रहांनी आपली स्थिती बदली आहे. 1 ऑक्टोबरला बुध कन्या राशीत, 2 ऑक्टोबरला शुक्र सिंह राशीत तर 3 ऑक्टोबरला मंगळ तूळ राशीत प्रवेश केला आहे. वेळोवेळी ग्रहांच्या संक्रमणामुळे कधी शुभ तर कधी अशुभ योग तयार होत असतात. शुक्र गोचरमुळे अतिशय शुभ असे दोन राजयोग तयार झाले आहेत. शुक्र तूळ राशीत असून शनिदेव हा कुंभ राशीत आहे. हे दोन घनिष्ठ मित्र एकमेकांच्या समोर आले आहेत. त्यामुळे तब्बल 30 वर्षांनी समसप्तक आणि केंद्र त्रिकोण राजयोगाची निर्मिती झाली आहे. या राजयोगामुळे तीन राशींच्या बँक बॅलेन्स दिवसेंदिवस वाढणार आहे.  (saturn venus making Kendra trikon rajyog and Samsaptak Rajyog these zodiac sign Rain of money)


मेष (Aries Zodiac)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या राशीच्या लोकांना केंद्र त्रिकोण आणि समसप्तक राजयोगाचा प्रचंड फायदा होणार आहे. शनि शुक्राच्या मैत्रीमुळे या लोकांना धनलाभ होणार आहे. अडकलेले पैसे या लोकांना परत मिळणार आहे. व्यवासायिकांसाठीही हा काळ भाग्यशाली ठरणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात फायदा होणार आहे. 


हेसुद्धा वाचा - Black Thread : काळा धागा बांधण्याचे अनेक फायदे, मात्र 'या' राशीच्या लोकांनी चुकूनही बांधू नये काळा धागा


मिथुन (Gemini Zodiac)


या राशीच्या लोकांसाठी केंद्र त्रिकोण आणि समसप्तक राजयोग सकारात्मक ठरणार आहे. शनि आणि शुक्राची उत्तम साथ या लोकांना मिळणार आहे. व्यावसायिकांचे अच्छे दिन सुरु होणार आहे. कार्यक्षेत्रातील अनेक कामं सहज पूर्ण होणार आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण असणार आहे. अनेक दिवसांपासून रखडलेली कामं मार्गी लागणार आहे. 


वृषभ (Taurus Zodiac) 


या राशीच्या लोकांना शुक्र आणि शनि ह्या दोघांचा जबरदस्त साथ मिळणार आहे. या काळात तुम्हाला अनेक मार्गाने लाभ होणार आहे.  घर किंवा गाडी खरेदीचे योग आहेत. जमीन व्यवहारातून धनलाभ होऊ शकतो. कमी मेहनतीत जास्त फळ लाभणार आहे. समाजात मान सन्मान वाढणार आहे. 


हेसुद्धा वाचा - October Eclipse : वर्षातील शेवटचं सूर्य आणि चंद्रग्रहण अतिशय खास, या राशींना मिळणार पैसाच पैसा


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)