Sun Shani and Shukra Grah Yuti: ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे खास राजयोग तयार होतात. यावेळी ग्रहांचा राजा सूर्य आणि न्याय दाता शनिदेव सध्या कुंभ राशीत भ्रमण करत असून 7 मार्च रोजी धन आणि वैभव देणारा शुक्र कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या ग्रहांच्या गोचरमुळे कुंभ राशीत शुक्र, सूर्य आणि शुक्र यांच्या संयोगामुळे त्रिग्रही योग तयार होणार आहे. कुंभ राशीमध्ये 30 वर्षांनंतर हा योग तयार होणार आहे. अशा स्थितीत या योगाच्या प्रभावाने काही राशींचे भाग्य उजळू शकते. संपत्तीतही वाढ होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया या त्रिग्रही योगामुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे.


मकर रास (Makar Zodiac)


त्रिग्रही योग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. धन आणि वाणीच्या घरावर सूर्य, शुक्र आणि शनीचा हा संयोग तुमच्या राशीत तयार होणार आहे. त्यामुळे यावेळी तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. करिअर आणि व्यवसायातील प्रगतीमुळे तुमची मानसिक स्थिती मजबूत होणार आहे. तुमचं व्यक्तिमत्वही सुधारणार आहे. संवाद, कला आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहे त्यांच्यासाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो.


वृषभ रास (Taurus Zodiac)


वृषभ राशीच्या लोकांसाठी उत्पन्न आणि गुंतवणुकीच्या बाबतीत त्रिग्रही योग फायदेशीर ठरू शकतो. अविवाहित लोकांना यावेळी नातेसंबंधाचा प्रस्ताव येऊ शकतो. तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. भागीदारी व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. तुम्हाला मित्रांकडून सर्व प्रकारचे सहकार्य मिळणार आहे. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. शेअर्समध्ये तुम्हाला लाभाची शक्यता आहे.


मिथुन रास (Mithun Zodiac)


मिथुन राशीच्या लोकांसाठी सूर्य, शुक्र आणि शनीचा योग अनुकूल ठरू शकतो. यावेळी नशीब तुम्हाला साथ देणार आहे. जीवनात सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घ्यायचे आहे त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. त्रिग्रही योग विद्यार्थ्यांसाठी शुभ सिद्ध होणार आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून प्रत्येक पावलावर पूर्ण पाठिंबा मिळेल. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )