Shani Nakshatra Parivartan: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी त्यांच्या राशींमध्ये बदल करतात. त्यानुसार ते त्यांच्या नक्षत्रांमध्येही बदल करतात. ग्रहांच्या नक्षत्र गोचरचा प्रभाव प्रत्येक राशीच्या व्यक्तींवर  त्याचा व्यापक प्रभाव पडतो. आगामी काळात शनीदेव त्यांच्या नक्षत्रात बदल करणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिदेव 7 एप्रिलला शतभिषा नक्षत्र सोडून भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. पूर्वा भाद्रपद नक्षत्रात गुरुचं वर्चस्व आहे. अशा स्थितीत शनिदेवाच्या नक्षत्रातील बदलाचा सर्व राशींवर नक्कीच काही ना काही प्रभाव पडणार आहे. पण अशा राशी आहेत ज्यांचं नशीब यावेळी चमकू शकणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत. 


मेष रास (Aries Zodiac)


भाद्रपद नक्षत्रात शनिदेवाचा प्रवेश तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. शनिदेव उत्पन्नाच्या घरात जाणार आहेत. त्यामुळे यावेळी तुमचा नफा वाढेल. सुख-सुविधांमध्ये वाढ होणार आहे. मुलांकडून काही चांगली बातमी येऊ शकते. जे अविवाहित आहेत त्यांचे लग्न होण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतूनही नफा मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही तुमचे पालक किंवा त्यांच्या नातेवाईकांमार्फत लाभ मिळवू शकता. तुमची आर्थिक स्थितीही चांगली होणार आहे.


वृषभ रास (Taurus Zodiac)


पूर्वा भाद्रपद नक्षत्रात शनिदेवाचा प्रवेश वृषभ राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकणार आहे. कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. जर तुम्ही व्यापारी असाल तर तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. यावेळी वडिलांसोबत तुमचे संबंध चांगले राहतील. तुम्ही घर आणि वाहन खरेदी करू शकता. या काळात तुमचे तुमच्या जोडीदारासोबतचे नाते खूप घट्ट होणार आहेत. या राशीच्या लोकांना स्वतःमध्ये एक विशिष्ट सुधारणा दिसून येऊ शकते.


मिथुन रास (Mithun Zodiac)


भाद्रपद नक्षत्रात शनिदेवाचा प्रवेश तुमच्यासाठी शुभ ठरू शकणार आहे. तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतात. शनिदेव तुमच्या राशीतून नवव्या घरातून मार्गक्रमण करतील. नशीब तुम्हाला साथ देणार आहे. तुम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठा देखील मिळेल. तुम्ही देश-विदेशात फिरू शकता. तुमची प्रलंबित कामे पूर्ण होणार आहेत. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)