Shani Dev Vakri 2024: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळेनुसार त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी 2024 मध्ये अनेक मोठ्या ग्रहांच्या हालचालीत बदल होणार आहेत. ज्यामध्ये शनि आणि गुरूची नावे देखील समाविष्ट आहेत. येत्या वर्षात म्हणजेच 2024 च्या सुरुवातीला शनिदेव वक्री चाल चालणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनी देवांच्या वक्री चालीमुळे काही राशींच्या आयुष्यात समस्या वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय या लोकांचे आर्थिक नुकसान होणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना या काळात त्रास होणार आहे.


कर्क रास (Cancer Zodiac)


शनिदेवाची प्रतिगामी गती तुमच्या लोकांसाठी हानिकारक ठरू शकते. शनिदेव तुमच्या राशीपासून आठव्या भावात वक्री फिरणार आहेत. तुमची प्रकृती बिघडू शकते. तसेच काही जुने आजार उद्भवू शकतात. तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल तणावग्रस्त राहू शकता. विवाहित लोकांना त्यांच्या जोडीदारासोबत तणाव असू शकतो. या काळात तुम्ही काळजीपूर्वक वाहन चालवावे. तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते.


वृश्चिक रास (Scorpio Zodiac)


शनिदेवाची उलटी चाल वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हानिकारक ठरू शकते. यावेळी तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आई किंवा सासऱ्यांसोबतचे संबंध बिघडू शकतात. कोणतेही पैसे उधार देणे टाळावं. अन्यथा पैसे बुडू शकतात. शनिदेवाचा प्रभाव तुमच्यावर आहे. तुम्ही लोकांनी कोणताही निर्णय यावेळी विचारपूर्वक घ्यावा. मालमत्तेशी संबंधित आणि वाहनाच्या बाबतीत सावधगिरी बाळगावी लागणार आहे.


मीन रास (Meen Zodiac)


शनीची वक्री चाल तुमच्यासाठी प्रतिकूल ठरू शकणार आहे. यावेळी तुमच्यावर काही खोटे आरोप केले जाऊ शकतात. तुम्हाला तणावाचा त्रास होऊ शकतो. बिझनेसबद्दल बोलल्यास काही समस्या उद्भवू शकतात. यावेळी अनावश्यक प्रवास होऊ शकतो. तसेच, या काळात तुमचे तुमच्या जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. या काळात छोटीशी चूकही तुमचं मोठं नुकसान करू शकते. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )