Shadashtak Yog: शुक्र-शनीने तयार केला षडाष्टक योग; `या` राशींवर पाण्यासारखा बरसणार पैसा
Shadashtak Yog: ज्योतिषशास्त्रीय शास्त्राच्या मान्यतेनुसार शुक्र आणि शनि हे अनुकूल ग्रह आहेत. या दोघांचा संयोग काही राशींसाठी लाभदायक ठरणार आहे.
Shadashtak Yog: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळी राशीमध्ये बदल करतो. ज्योतिष शास्त्रात ग्रहांचा संयोग फार महत्वाचा मानला जातो. ग्रहांचा संयोग सर्व 12 राशींवर परिणाम करतो. अशातच शनि आणि शुक्र यांनी मिळून षडाष्टक योग तयार केला आहे.
ज्योतिषशास्त्रीय शास्त्राच्या मान्यतेनुसार शुक्र आणि शनि हे अनुकूल ग्रह आहेत. या दोघांचा संयोग काही राशींसाठी लाभदायक ठरणार आहे. षडाष्टक योगाच्या शुभ प्रभावामुळे काही राशींना देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वादही प्राप्त होतो. जाणून घेऊया शनि आणि शुक्राच्या संयोगाने कोणत्या राशींना फायदा होणार आहे.
मेष रास
षडाष्टक योगाच्या निर्मितीमुळे या राशींच्या व्यक्तींना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तसंच आर्थिक बाजू मजबूत राहील. कौटुंबिक जीवनात आनंदाचा अनुभव घेऊ शकणार आहात. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील.
मिथुन रास
हा काळ आशीर्वादापेक्षा कमी नसणार आहे. नवीन काम सुरू करण्यासाठी चांगला काळ आहे. यावेळी तुम्हाला कामात यश मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहील. आर्थिक लाभ होईल, ज्यामुळे आर्थिक बाजू मजबूत होईल. सुखसोयी मिळविण्याची तुमची इच्छा वाढणार आहे.
सिंह रास
षडाष्टक योगाच्या निर्मितीमुळे तुम्हाला शुभ परिणाम मिळणार आहेत. आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळणार आहे. शिक्षण क्षेत्राशी निगडित लोकांसाठी हा काळ वरदानापेक्षा कमी नसणार आहे. लग्नाचीही शक्यता आहे. पद आणि प्रतिष्ठा यांचे फायदे मिळतील.
कन्या रास
नोकरी आणि व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित प्रकरणे मार्गी लागणार आहेत. घर किंवा नवीन वाहन खरेदी करू शकता. व्यावसायिकांसाठी हा काळ खूप चांगला असणार आहे. यावेळी उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील. या काळात तुम्ही नवीन काम सुरू करू शकता.
धनु रास
धार्मिक व आध्यात्मिक कार्यात सहभागी होणार आहात. तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल. कुटुंबात शुभ कार्ये घडू शकतात. व्यावसायिकांना अडकलेले पैसे मिळू शकतात. या काळात संपत्तीत वाढ होईल आणि नशीब तुमच्या बाजूने असेल.करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी तुम्हाला जास्त प्रयत्न करावे लागणार नाहीत.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )