Mangal And Shani Conjunction 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रात एकूण 9 ग्रह असून ते ठराविक वेळेनंतर आपली स्थिती बदलता. अशावेळी ते मित्र आणि शत्रू ग्रहांसोबत संपर्कात येतात. शत्रू ग्रहांचं मिलन हे देश, जग आणि मानवावर परिणाम करतात. ग्रहांची ही भेट काहींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ ठरते. गेल्या वर्षी 2023 मध्ये शनिदेव कुंभ राशीत प्रवेश केला असून तिथे तो अडीच वर्ष विराजमान असणार आहे. अशात इतर ग्रहांशीही त्याचा संबंध येणार आहे. तब्बल 30 वर्षांनंतर कुंभ राशी शनिदेवाला शत्रू ग्रह मंगळ भेटणार आहे. शनिदेव मंगळ भेट काही राशीच्या लोकांसाठी अचडणीची ठरणार आहे. या लोकांना आर्थिक अडचणीसोबत आरोग्याच्या समस्या त्रासदायक ठरणार आहे. (Dangerous combination of Saturn and Mars after 30 years These people have health problems along with loss of wealth)


वृश्चिक रास (Scorpio Zodiac)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनि आणि मंगळाचा हा संयोग तुमच्या राशीच्या चौथ्या घरात होत तो तुमच्यासाठी घातक ठरणार आहे. त्यामुळे या संयोगामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडणार आहे. त्याशिवाय तुमची तब्येतही खालावण्याची शक्यता आहे. या काळात कोणतेही नवीन काम सुरू करणे तुमच्यासाठी नुकसानदायक ठरेल. करिअर आणि व्यवसायात कोणतेही बदल या काळात करु नका. यावेळी, तुमच्या आईसोबतच्या नात्यात तणाव निर्माण होईल. शनीची साडेसाती चालू असल्याने तब्येतीची काळजी घ्या.


कर्क रास (Cancer Zodiac)   


शनि आणि मंगळाचा संयोग तुमच्या कुंडलीत आठव्या घरात होत असल्याने तुमच्यासाठी तो अशुभ ठरणार आहे. या संयोगामुळे छुप्या आजार डोक वर काढणार आहे. त्यासोबतच तुमचे आर्थिक नुकसान होणार आहे. अपघाताचीही शक्यता आहे. नवीन गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तो टाळा. शनिच्या प्रभावामुळे मानसिक तणाव तुम्हाला त्रासदायक ठरणार आहे. तुमच रागावर नियंत्रण राहणार नाही. 


मीन रास (Pisces Zodiac)  


तुमच्या पारगमन कुंडलीच्या 12व्या घरात मंगळ आणि शनीच संयोग होणार आहे. त्यामुळे हा संयोग तुमच्यासाठी हानिकारक ठरणार आहे. तुमच्यावर काही खोटे आरोप होण्याची शक्यता आहे. काही अनावश्यक खर्चही या काळात होणार आहे. तसंच, यावेळी तुमच्यावर कर्जाचा बोझा वाढणार आहे. त्याशिवाय, तुम्हाला काही गोष्टींबद्दल तणाव जाणवणार आहे. व्यवसायिकांना जास्त अडचणीचा सामना करावा लागणार आहे. तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावा लागणार आहे. या काळात तुमची प्रकृती बिघडणार असल्याने त्याकडे दुर्लक्ष करु नका. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)